SIR : ‘एसआयआर’साठी राजकीय हालचाली; मतदार याद्यांवर नजर

political parties geared up for SIR : बुथनिहाय ‘नावे तपासा, नावे वाढवा’चा फॉर्म्युला चर्चेत

Buldhana जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला आता स्पष्टपणे राजकीय किनार लाभू लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रशासनाची ही नियमित प्रक्रिया असली, तरी विविध पक्षांची अचानक वाढलेली सक्रियता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

अलीकडेच भाजपची या संदर्भात राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग आला असून, विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत. जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रासाठी माजी नगरसेवक नीलेश शर्मा यांची नियुक्ती ही त्याच धोरणाचा भाग मानली जात आहे. मात्र, या नियुक्त्यांचा उद्देश केवळ संघटन बळकटी करणे आहे की मतदार यादीत ‘आपल्या’ समर्थकांची नोंद निश्चित करण्याची रणनीती, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Fuel crisis : ऐकावे ते नवलच! 200 लिटरच्या टाकीत डिझेल भरून आणले!

मतदार यादी ही कोणत्याही निवडणुकीचा कणा मानली जाते. त्यामुळे हा पाया भक्कम ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. ‘एसआयआर’च्या निमित्ताने बूथनिहाय हालचाली वाढल्या असून, कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन मतदारांची नावे तपासणे, नवीन नावे समाविष्ट करणे आणि वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याचे निर्देश दिले जात असल्याची माहिती पुढे येत आहे.

Nitesh rane : नितेश राणेंकडून विरोधी आमदाराचे तोंडभर कौतुक!

विशेष म्हणजे, एका पक्षाने या मोहिमेत आघाडी घेतल्यानंतर इतर पक्षही सतर्क झाले असून, त्यांनीही आपापल्या पातळीवर संघटन सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, सध्या ‘नावे वाढवा, नावे तपासा’ हा राजकीय मंत्रच कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार होत असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय हस्तक्षेपाबाबत शंका उपस्थित होत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत होणाऱ्या बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.