Preparations of the Election Commission for West Vidarbha are underway : जिल्हा परिषद आणि महापालिकांसंबंधी मागवली माहिती
Amravati राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद गट व गण तसेच महापालिकांच्या प्रभागांबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांवर प्रशासक नेमले गेले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांसाठी आरक्षणाशी संबंधित प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुकांची तारीख निश्चित होऊ शकलेली नाही. तरीसुद्धा, निवडणूक आयोगाने तयारीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेतील गट व पंचायत समित्यांमधील गणांच्या तपशीलाची मागणी केली गेली आहे.
Nagpur police : नागपुरातील वाढत्या अपघातांची मुख्य सचिवांकडून दखल
अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या १०८ गणांमध्ये सदस्यांची मुदत २० जानेवारी रोजी संपली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीचे १०४ गण आहेत. या सर्व ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nagpur congress : कुणाल राऊतांची प्रियांका गांधींच्या ‘रोड शो’ला दांडी का?
अकोला व अमरावती महापालिकांवरही सध्या प्रशासक कार्यरत आहेत. तीन वर्षांपासून प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या या महापालिकांमधील प्रभाग रचनेसंदर्भात आयोगाने पूर्वीच माहिती मागविली आहे. राज्य शासनाच्या आगामी निर्णयानुसार या प्रभागांची पुनर्रचना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.