व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकेचे आता ‘इंग्रजी’वर लक्ष, धाडसी निर्णय

Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकेचे आता ‘इंग्रजी’वर लक्ष, धाडसी निर्णय

Nagpur Municipal Corporation to recruit English teachers : भाषावादाच्या पलीकडे जात करणार इंग्रजी शिक्षकांची भरती, शिक्षण विशेष समितीची बैठक

Nagpur काही काळापूर्वी मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. या मुद्द्यावरून तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाढता विरोध आणि साहित्यिकांचा रोष लक्षात घेता, सरकारने अखेर पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, विदर्भ साहित्य संघावर हिंदी भाषिक अध्यक्षांची निवड झाल्याने राज्यातील ‘भाषावाद’ आता काहीसा निवळल्याचे चित्र आहे. हीच संधी साधून नागपूर महानगरपालिकेने मराठी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आता इंग्रजी भाषेवर लक्ष केंद्रित करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘शिक्षण विशेष समिती’च्या सभापती संतोषदेवी दीपक लठ्ठा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी २०२६-२७ शैक्षणिक सत्रात रिक्त पदांवर विशेषत्वाने इंग्रजी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे, तिथे सेमी-इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत

Maharashtra politics : ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक? एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या प्लॅनला भाजपचा रेड सिग्नल!

महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीत शाळांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिस्तीसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक मशीन तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेश (युनिफॉर्म), शूज आणि सॉक्स यांचा दर्जा तपासूनच त्यांची खरेदी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना व्याकरणाची स्वतंत्र पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी पालकांची माहिती आणि मोबाईल क्रमांकासह विशेष नोंदणी रजिस्टर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Iran war strategy : “होर्मुझ बंद राहिली तरी चालेल, पण युद्ध थांबवा”

या बैठकीला उपसभापती भारती विकास बुंदे, सदस्य विनय विवेक दाणी, वैशाली विलास उदापूरकर, अंकित खुनंदन चौधरी, कांचन सतीश चव्हाण, वर्षा बंडू डोंगरे यांच्यासह उपायुक्त (शिक्षण) डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!