Big relief for homebuyers; ‘Ready Reckoner’ rates remain unchanged : बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे संघटनांनी दर स्थिर ठेवण्याची केली होती मागणी
Nagpur राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी आणि सर्वसामान्य घर खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ‘रेडी रेकनर’च्या (वार्षिक मूल्यदर तक्ता) दरांमध्ये कोणतीही वाढ न करता, ते मागील वर्षाप्रमाणेच ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून हे नवीन दर लागू होतील.
जागतिक आर्थिक परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेता, ‘क्रेडाई’ सारख्या संघटनांनी दर स्थिर ठेवण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मागणी मान्य करत दरवाढीची टक्केवारी ‘निरंक’ ठेवली आहे. यामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिक कात्री लागणार नाही.
Tukaram mundhe : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
दर स्थिर ठेवले असले तरी, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलात विक्रमी वाढ झाली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात (३० मार्चपर्यंत) शासनाच्या तिजोरीत ६०,५६८.९४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये ‘आय-सरिता’ प्रणालीचा सिंहाचा वाटा असून, त्याद्वारे एकट्या ४९,५३४ कोटींचा महसूल मिळाला आहे.
प्रशासनाने केवळ दर स्थिर ठेवले नाहीत, तर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक तांत्रिक बदल केले आहेत. मंजूर विकास योजनांची (DP) अंमलबजावणी, नवीन सर्व्हे नंबरची नोंद आणि गावांमधील नावांच्या दुरुस्त्या यांमुळे दस्त नोंदणी प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत आणि वास्तववादी होणार आहे.
https://sattavedh.com/31409-2allegations-of-100-crores-corruption-in-melghat-jal-jeevan-missio
“बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आम्ही यंदा दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळकतींचे वास्तव लक्षात घेऊनच बाजारमूल्य निश्चित केले असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.








