Crime rate decreased in Wardha: वर्षभरात ३ हजार ८४ गंभीर गुन्ह्यांची नोंद
Wardha जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरिता पोलिस प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. या वर्षभरात एकूण ३ हजार ८४ गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये जिल्ह्याच्या अभिलेखावरील हत्या, हत्येचा प्रयत्न, डकेती, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, बलात्कार, विनयभंग व फसवणूक आदी गंभीर गुन्ह्यांत घट झाली आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली. त्यांनी गेल्या वर्षभरातील माहितीचा लेखाजोखा मांडला. २०२३ मध्ये ३ हजार २४७ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. २०२४ मध्ये ३ हजार ८४ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. २०२३ तुलनेत १६३ गुन्हे कमी नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
Nagpur police : नागपुरातील वाढत्या अपघातांची मुख्य सचिवांकडून दखल
दारू, अमली पदार्थांची विक्री करणारे व सेवन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्ष २०२३ मध्ये अवैध दारू व्यवसाय प्रकरणी ७ हजार ४५२ गुन्ह्यांची नोंद करून २२ कोटी ६१ लाख ६१ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर ‘एनडीपीएस’अंतर्गत ६६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये अवैध दारू व्यवसायप्रकरणी ८ हजार ६५ गुन्हे दाखल करून ३१ कोटी ३३ लाख ३३ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ‘एडीपीएस’अंतर्गत ११४ गुन्हे नोंदविले आहेत.
२७ आंतरराज्यीय टोळ्यांना शोधून अटक करण्यात आली. पोलिस दलांनी या टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून ३१ गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीलाही आळा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. वर्षभरात १५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३५ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबतच अवैध गोवंश तस्करीलाही आळा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.
२०२३ च्या दुप्पटपेक्षाही अधिक म्हणजे तब्बल ४९ गुन्ह्यांची नोद करण्यात आली. ११३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून ७४१ जनावरांची सुटका केली. ४४ वाहनांसह ३ कोटी ५१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Robbed at gunpoint : बंदुकीच्या धाकावर लुटले; सव्वा दोन लाखांचे दागिने पळविले
जिल्ह्यात वर्ष २०२३ मध्ये ४५.९६ टक्के व वर्ष २०२४ मध्ये ६६.५४ टक्के दोषसिद्धी झालेली आहे. या वर्षात दोषसिद्धीचे प्रमाण २०.५८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत यावर्षी ९ हजार ७७८ प्रतिबंधित कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही २०२३ च्या तुलनेत तब्बल २ हजार ८९ ने जास्त आहे.
वर्षभरात जिल्ह्यात मोबाइल हरविल्याच्या ८२० तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४८८ मोबाइल ट्रेस करून मोबाइल मालकांना परत देण्यात आले.