Youth congress executive body selected directly instade of elections : राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना दिलेले प्राधान्य
Nagpur महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बदलांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपली नवी ‘महाजम्बो’ कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये १२६ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, युवक काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर आता ‘इलेक्शन’ पद्धत बंद करून थेट नियुक्त्यांचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
या नव्या कार्यकारिणीत अनिकेत नवले व अक्षय जैन यांची खजिनदारपदी, प्रविणकुमार बिरादार यांची संघटन सरचिटणीसपदी, तर विवेक गावंडे यांची प्रशासन सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. उपाध्यक्षपदाची धुरा तनवीर विद्रोही, प्रशांत ओगले, प्रथमेश अबनावे, कपिल ढोके, अनुराग भोयर, अभिषेक धवड, आमेर अब्दुल सलीम, दिप्तेश परब आणि आफरीन हुसेन या नऊ जणांवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय ४४ सरचिटणीस आणि ७४ प्रदेश सचिवांचा समावेश करून एक विस्तृत फळी उभी करण्यात आली आहे.
Oracle company: १२ हजार भारतीयांना नोकरीवरून काढलं, पहाटे पाच वाजता पाठवला ईमेल
या निवडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना दिलेले प्राधान्य. संघटनेसाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत असून, काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी ही नवी टीम सज्ज असल्याचे चित्र आहे.
Legislative Council election : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मुंबई वारी, जोरदार लॉबिंग
माजी अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कार्यकाळात झालेल्या वादग्रस्त निर्णयामुळे संघटनेत मोठा असंतोष निर्माण झाला होता. अनेक पदाधिकाऱ्यांना परस्पर मुक्त केल्याने हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून युवक काँग्रेसने निवडणुकांची किचकट पद्धत बंद करून थेट गुणवत्तेवर आधारित नियुक्त्या देण्यास सुरुवात केली आहे. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी युवकांच्या प्रश्नांवर जोरदार आंदोलने करतील आणि पक्षाची ताकद वाढवतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे








