व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Voter verification drive : रिसोडमध्ये बीएलओवर हल्ला; मतदार पडताळणी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांत...

Voter verification drive : रिसोडमध्ये बीएलओवर हल्ला; मतदार पडताळणी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांत संताप

BLO attacked in Risod; voter verification work disrupted : मॅपिंगदरम्यान तीन जणांकडून मारहाण; जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू, आरोपी अद्याप फरार

Akola राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेदरम्यान रिसोड शहरात बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) वर झालेल्या हल्ल्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष पुनर्पडताळणी आणि मॅपिंगच्या कामासाठी गेलेले बीएलओ नवनाथ मुंढे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. या घटनेत मुंढे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Car accident : भरधाव कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या प्रकारामुळे निवडणूक कामकाजात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचारी संघटनांनी घटनेचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, वृत्त लिहीपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

error: Content is protected !!