व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul bondre : ‘ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात’, भाजप-सेनेवर टीका

Rahul bondre : ‘ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात’, भाजप-सेनेवर टीका

Congress leader alleges a nexus between BJP and Shivsena in Chikhli : चिखलीत भाजप-शिवसेनेची मिलीभगत असल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

Chikhli चिखलीतील स्थानिक राजकारणात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची अप्रत्यक्ष युती व परस्पर समन्वय सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. “ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात” अशी उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी चिखलीत भाजप-शिवसेनेची मिलीभगत उघड असल्याचा दावा केला.

पत्रकार परिषदेत बोंद्रे म्हणाले की, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना बहिण म्हणून संबोधतात, तर दुसरीकडे श्वेता महाले या त्यांना राजकीय विरोधक असल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात भाजपवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये येऊ न देता शिवसेनेकडे वळवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपला स्थानिक पातळीवर काँग्रेसच भिडू शकते, याची जाणीव असल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेला मुद्दाम जवळ केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चिखलीतील राजकीय समीकरणे “ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात” अशा स्वरूपाची झाल्याची टीका त्यांनी केली.

रेणुकादेवी यात्रेनिमित्त आमदार संजय गायकवाड चिखलीत आले होते. त्याच दिवशी ते अचानक आपल्या घरी आल्याने पाहुणे म्हणून त्यांचे स्वागत केले, असे स्पष्ट करत बोंद्रे म्हणाले, “चिखलीचे सुसंस्कृत राजकारण मी कायम जपले असून, त्याचा मला सार्थ अभिमान आहे.” वैचारिक विरोध कायम असला तरी वैयक्तिक संबंध आणि राजकीय संस्कृती यांना आपण नेहमीच प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले.

rahul bondre : राहुल बोंद्रे यांच्या फलकावर चपला मारल्या, महिलांचा रोष

यावेळी त्यांनी भाजपच्या “मोडस ऑपरेंडी” वरही जोरदार टीका केली. देशभरात भाजप विरोधकांबाबत चर्चा निर्माण करणे, दबावाचे वातावरण तयार करणे आणि पक्षप्रवेशासाठी भाग पाडणे, हीच त्यांची पद्धत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, चिखली विधानसभा मतदारसंघात भाजप काँग्रेसला चांगलेच घाबरते, असा दावा त्यांनी यावेळी केला.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा दाखला देताना बोंद्रे म्हणाले की, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असतानाही चिखलीत काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून आले. तसेच काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाही मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. या निकालामुळे भाजपच्या तंबूत घबराट पसरल्याचा टोला त्यांनी लगावला.

Malkapur municipal council : कुरघोडीच्या राजकारणात काँग्रेसचे संघटन विस्कळीत

भाजप राबवत असलेल्या या राजकीय डावपेचांना काँग्रेसचे पदाधिकारी कधीही बळी पडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत आगामी काळात चिखली मतदारसंघात काँग्रेस अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!