व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र America iran ceasefire : अमेरिका–इराण तणावात मोठा दिलासा; दोन आठवड्यांच्या युद्धविराम !

America iran ceasefire : अमेरिका–इराण तणावात मोठा दिलासा; दोन आठवड्यांच्या युद्धविराम !

america-iran-ceasefire-two-weeks-donald-trump-israel-agreement-marathi-news : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इस्रायलही हल्ले थांबवणार

New Delhi: अमेरिका आणि ईरान यांच्यात वाढलेल्या तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर दिलासादायक घडामोड समोर आली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी सैन्य कारवाई स्थगित करण्याची घोषणा केली आहे. अमेरिका, ईरान आणि इस्रायल या तिन्ही बाजूंनी या तात्पुरत्या युद्धविरामाला सहमती दर्शवली असून त्यामुळे संभाव्य महायुद्धाचा धोका काही काळासाठी टळल्याचे चित्र आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या माध्यमावर पोस्ट करत दोन आठवड्यांसाठी ईरानवर होणारे बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. हा निर्णय दीर्घकालीन शांतता कराराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या कालावधीत दोन्ही बाजूंनी संयम राखण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की हा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला. या दोन्ही नेत्यांनी संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेला विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये पुढील चर्चेची रूपरेषा आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या युद्धविरामासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या असून त्यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ईरानने पुन्हा खुला करणे ही आहे. जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा समुद्री मार्ग बंद राहिल्यास आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेने आपली लष्करी उद्दिष्टे साध्य केली असून त्यापेक्षाही अधिक यश मिळवले आहे. तसेच ईरानकडून १० मुद्द्यांचा प्रस्ताव मिळाल्याचे त्यांनी सांगितले असून त्या आधारे चर्चेला गती मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक सहमती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Eknath shinde : शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता !

या दोन आठवड्यांच्या युद्धविरामामुळे दोन्ही देशांना अंतिम कराराचा आराखडा तयार करण्यासाठी वेळ मिळणार असून दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाच्या तोडग्याकडे वाटचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी यापूर्वी दिलेल्या कठोर इशाऱ्यांनंतर हा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mahayuti government : महायुती सरकारचा विकास फक्त कागदावर? ९६,४०० कोटींची थकबाकी न दिल्याने कंत्राटदारांचा ‘एल्गार’; आजपासून राज्यभर ‘काम बंद’!

दरम्यान, व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी देखील या घडामोडींवर प्रतिक्रिया देत चर्चा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेनुसार पुढील दिशा निश्चित होईल आणि अमेरिकेच्या भूमिकेमुळे ईरानला स्ट्रेट ऑफ होर्मुज उघडण्यास तयार व्हावे लागले आहे.
सध्याच्या घडामोडींमुळे जगभरात तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत असली तरी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चांमधून कोणता ठोस निर्णय पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!