Extra marital affair : निघाले कॅनडाला पोहोचले अकोल्यात !

A married woman with her boyfriend was taken into custody : प्रियकरासह विवाहितेला अकोल्यातून घेतले ताब्यात

Affair विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकलेली एक महिला तिच्या पतीसोबत दिल्लीहून Delhi कॅनडाला निघाली. पण अचानक विमानतळावरून गायब झाली. काही वेळाने ती विमानतळावरूनच प्रियकरासोबत फरार झाल्याचे उघडकीस आले. तेथून थेट अकोल्यात Akola आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रियकरासह या विवाहितेला ताब्यात घेतले. या फिल्मी घटनेची सध्या अकोल्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

हरियाणा येथील रहिवासी असलेले पती-पत्नी दिल्ली विमानतळावरून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होते. प्रियकराला बोलावून पत्नीने दिल्ली विमानतळावरून पळ काढला. दोघेही अकोला येथे एका लॉजमध्ये असताना दिल्ली पोलिसांनी अकोला गाठून दोघांनाही बुधवारी ताब्यात घेतले. हरियाणा येथील एक दाम्पत्य नोकरीनिमित्त कॅनडा येथे जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते.

पतीला दिला गुंगारा..

पत्नी विवाहबाह्य संबंधात अडकली असल्याने ती कॅनडाला जाण्यास उत्सुक नव्हती. तिने प्रियकराला बोलावून घेत दिल्ली विमानतळावरून पतीला गुंगारा देत पळ काढला. त्यानंतर दोघेही मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेले. उज्जैनवरून अकोला गाठले. अकोल्यावरून औंढा नागनाथ येथे जाण्याच्या तयारीत असताना रात्री उशीर झाल्याने प्रियकर व प्रेयसी दोघेही अकोल्यातील रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका लॉजमध्ये मुक्कामी होते.

Devendra Fadanvis : जनतेप्रमाणे प्रकल्पांनासुद्धा मिळणार ‘आधार’

लोकेशनवरून लागला सुगावा..

दिल्ली पोलिसांनी पत्नीचे व प्रियकराचे मोबाइल लोकेशन काढले असता दोघेही अकोल्यात असल्याची माहिती मिळाली. यावरून दिल्ली पोलिसांनी विमानाने मुंबई व तेथून समृद्धी महामार्गाने अकोला गाठले. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांच्या सहकार्याने पत्नी व प्रियकरास १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पत्नीला पतीच्या स्वाधीन केले; मात्र पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत जाण्यास पसंती दिली.

पोलिस स्टेशनमध्ये नोंद नाही..

त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात नेमका कोणता निर्णय घ्यावा हे कळेनासे झाले. अखेर तिघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र कोणीही ऐकण्यास तयार नसल्याने तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी अकोल्यातून विवाहित प्रेमिका व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असले तरी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.