व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana Politics : सत्काराच्या आड नवे समीकरण? बुलढाणा–चिखलीत ‘पॉलिटिकल सेटिंग’!

Buldhana Politics : सत्काराच्या आड नवे समीकरण? बुलढाणा–चिखलीत ‘पॉलिटिकल सेटिंग’!

New political equations in process ahead of ZP elections : निवडक लोकांनाच कार्यक्रमाचे निमंत्रण, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी तयारीला वेग

Buldhana बुलढाणा आणि चिखलीच्या राजकारणात सध्या सत्कार, पक्षप्रवेश आणि निवडक भेटीगाठींच्या माध्यमातून नवे संकेत दिले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. वरकरणी सन्मानाचा कार्यक्रम दिसत असला, तरी पडद्यामागे राजकीय संदेशांची सूक्ष्म देवाणघेवाण सुरू असल्याचे चित्र स्थानिक राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

अलीकडे चिखलीत शिंदेसेनेकडून झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यांनी आधीच राजकीय तापमान वाढवले आहे. या पार्श्वभूमीवर आता बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेला आमदार श्वेता महाले, प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले आणि चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव सपकाळ यांच्या सत्काराचा सोहळा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या कार्यक्रमाकडे केवळ सामाजिक सन्मान म्हणून न पाहता, आगामी राजकीय समीकरणांची चाचपणी म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा आहे.

Sanjay raut : “फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केली” राऊतांचा घणाघात

विशेषतः महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या सत्कार सोहळ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये पक्षप्रवेश, संघटन विस्तार आणि स्थानिक प्रभाव वाढवण्याच्या हालचाली वेगात सुरू असताना, अशा व्यासपीठांवरून “कोण कुणासोबत?” हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

Balwant Wankhede : खूप झाल्या बैठका, आता कामाला लागा, खासदाराचा अल्टीमेटम

या कार्यक्रमाबाबत सर्वाधिक चर्चा निवडक लोकांनाच निमंत्रण दिल्याच्या कथित बाबीवर रंगली आहे. त्यामुळे हा केवळ सत्कार सोहळा नसून, पडद्यामागे काही महत्त्वाच्या राजकीय हालचालींची “इनसाइड गेम” सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही राजकीय जाणकारांच्या मते, अशा निवडक व्यासपीठांवरून भविष्यातील स्थानिक आघाड्या, पक्षप्रवेश किंवा नेतृत्वाची नव्याने मांडणी याची पायाभरणी केली जाते. यामुळेच आता प्रश्न उपस्थित होत आहे की, हा फक्त सत्काराचा सोहळा आहे की पुढील मोठ्या राजकीय एंट्रीचा ‘ट्रेलर’? उघडपणे कुणीही यावर भाष्य करत नसले, तरी अंतर्गत पातळीवर चर्चांना वेग आला आहे.

error: Content is protected !!