Internal strife within the alliance due to one-upmanship among partner parties : मित्र पक्षांवर कुरघोडीमुळे आघाडी-युतीमध्ये अंतर्गत कलह
Buldhana जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात सध्या “एंट्री”चा हंगाम जोरात सुरू असून, गेल्या वर्षभरात शिंदेसेनेकडून उघडपणे राबवण्यात आलेल्या पक्षप्रवेश मोहिमेमुळे मित्रपक्षांमध्येच अस्वस्थतेची भावना वाढल्याचे चित्र आहे. काँग्रेसपासून भाजपपर्यंत विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी शिंदेसेना सातत्याने पुढाकार घेत असल्याने महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.
विशेषतः भाजपमध्ये या घडामोडींमुळे आतील धुसफूस वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवर आधीपासून मेहनत घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये “आपलेच लोक मित्रपक्षाकडे वळत आहेत” अशी भावना निर्माण होत असल्याने संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.
Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंची सेना लागली कामाला, गावपातळीवर ‘फिल्डींग’!
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ एप्रिल रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक घेत “काम नाही, तर पद नाही” असा स्पष्ट संदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या हालचालींना अधिक वेग आला आहे. लोकप्रतिनिधींनाही “पद विसरा, कार्यकर्ता बना” असा स्पष्ट इशारा दिल्याने आता जिल्हास्तरावरील पदाधिकारी आणि स्थानिक नेते थेट मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
मतदार याद्यांची छाननी, बूथ पातळीवरील तपासणी, स्थानिक संपर्क मोहिमा आणि नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर भर यामुळे जिल्ह्यात “ग्राउंड गेम”ची औपचारिक सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. बूथ ते गावपातळीपर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी शिंदेसेना आक्रमक मोडमध्ये गेल्याची चर्चा आहे.
Property tax hike : करवाढीच्या सुनावणीत ‘थकबाकी’चा बॉम्ब; मलकापूर न.प.समोर आर्थिक संकट
मात्र राजकीय वर्तुळात खरी चर्चा एका वेगळ्याच मुद्द्यावर रंगली आहे. बुलढाण्यात आधीपासून सुरू असलेला “एंट्री पॅटर्न” आता थेट मुंबईतून हिरवी झेंडी मिळाल्यासारखा भासू लागला आहे. त्यामुळे शिंदेसेनेचा वेग आणखी वाढण्याची आणि त्याच वेळी भाजपमधील अस्वस्थता उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








