व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nashik crime : नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणाला भीषण वळण...

Nashik crime : नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणाला भीषण वळण !

nashik-it-company-conversion-sexual-exploitation-sit-investigation-marathi-news : 2022 पासून कट्टरतेचे जाळे उघड, एसआयटी तपास तीव्र

Nashik : नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले असून विशेष तपास पथकाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून संशयितांच्या हालचालींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी केवळ नोकरीच्या निमित्ताने नव्हे तर विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून कंपनीत कार्यरत होते. कामकाज संपल्यानंतरही संशयित कंपनीतच थांबून गुप्त हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिला कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकून त्यांना विशिष्ट विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Navneet Rana : नवनीत राणा म्हणतात, ‘आपको हम जैसे हजारों मिलेंगे, पर…’

एसआयटीला संशय आहे की, 2022 पासूनच कंपनीत कट्टरतेचे जाळे विणण्यास सुरुवात झाली होती. कंपनीच्या साधनसंपत्तीचा आणि वेळेचा वापर करून काही महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर संशयितांना परदेशातील व्यक्ती किंवा संघटनांकडून आर्थिक मदत मिळत होती का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. संशयितांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असून ई-मेल, चॅट, कॉल रेकॉर्ड आणि धमकीच्या संदेशांची सखोल तपासणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाची संशयित आणि कंपनीची सहाय्यक महाव्यवस्थापक अश्विनी चैनानी हिच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान कंपनीच्या सर्व्हरवरून चैनानीला पाठवण्यात आलेल्या ७८ ई-मेल्सचा तपास सुरू असून हे ई-मेल्स पीडितांच्या तक्रारींशी संबंधित आहेत की गुन्ह्याचा कट रचण्यासाठी वापरले गेले, याचा शोध घेतला जात आहे.

Akola Municipal Corporation : मालमत्ता करात घंटागाडीचे वार्षिक ६०० रुपये; विरोधकांनी सभागृह सोडले

तसेच चैनानी आणि मुख्य संशयित तौसिफ अत्तार यांच्यात गेल्या दोन वर्षांत ३८ वेळा संभाषण झाल्याचे उघड झाले असून दानिश शेख आणि रझा मेमन यांच्याशीही तिचा सातत्याने संपर्क असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. एका पीडितेने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर तिला मदत करण्याऐवजी तिचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सरकारी पक्षाने न्यायालयात मांडला आहे.

Akola Municipal Corporation : सकाळी आमदारकीचे स्वप्न, दुपारी स्थायी समितीत अश्लील शिवीगाळ; अकोला मनपात अभूतपूर्व गोंधळ

या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे लैंगिक छळ प्रतिबंधक समितीतील सदस्य असलेल्या अश्विनी चैनानी यांनी 2023 पासून सुरू असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष का केले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीडितांवर मानसिक दबाव टाकण्यात तिची भूमिका असल्याचा संशय बळावत असून तपास पुढील टप्प्यात अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

एकूणच, या प्रकरणाने केवळ नाशिकच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडवली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

__

error: Content is protected !!