व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण District planning committee : नियोजन समितीत भाजपच ‘बॉस’, बॅलन्स साधण्यासाठी मित्र पक्षांना...

District planning committee : नियोजन समितीत भाजपच ‘बॉस’, बॅलन्स साधण्यासाठी मित्र पक्षांना संधी

15 members appointed to the District Planning Committee in Amravati : अमरावती जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची लागली लाॅटरी

Amravati जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित अशा एकूण १५ सदस्यांच्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त लागला असून, यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नियोजन विभागाच्या उपसचिवांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून या नियुक्त्या प्रलंबित होत्या. पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून ही नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रतीक्षा लागून होती. अखेर या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे.

जिल्हा नियोजन समितीत आमदार व जिल्हा परिषद सदस्यांबरोबरच नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार अमरावती जिल्ह्यासाठी १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा भरणा असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रतिनिधींनाही संधी देण्यात आली आहे. नामनिर्देशित सदस्य म्हणून धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख व प्रभुदास भिलावेकर यांचा समावेश आहे.

Buldhana Politics : महायुतीत ‘पॉवर बॅलन्स’चा प्रश्न; राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप अस्वस्थ

तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे चौधरी, सुनील खराटे, युवा स्वाभिमान पक्षाचे आशिष कावरे व विनोद जायलवाल, शिवसेनेचे संतोष बद्रे, श्याम देशमुख, आशिष धर्माळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, नेत्या सुरेखा ठाकरे तसेच दीपक लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्हा नियोजन समितीचे कामकाज आता अधिक गतीने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!