Breaking

Solar energy : सौर उर्जेचे फायदे शेतकऱ्यांना दिसू लागले!

Villages near Chandur Biswa Substations will get uninterrupted power supply : चांदूर बिस्वा उपकेंद्रांवरील गावांना मिळणार अखंडित वीजपुरवठा

Buldhana : महावितरणच्या नांदुरा उपविभाआगाअंतर्गत ३३ केव्ही चांदुर बिस्वा उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मरची ५ एमव्हीएने क्षमता वाढवण्यात आली आहे. १० एमव्हीएचे नविन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहे. त्यामुळे वडनेर आणि चांदुर बिस्वा क्षेत्रातील जवळपास दहा ते बारा गावांतील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्याची सोय झाली आहे, अशी माहिती मलकापूरचे कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत चांदुर बिस्वा क्षेत्रात सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. उपकेंद्रातून निर्मिती होणारी वीज ३३ केव्ही चांदुर बिस्वा उपकेंद्रातील कृषी वाहिन्यासाठी वापरून परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ३३ केव्ही चांदूर बिस्वा उपकेंद्रात असलेल्या प्रत्येकी ५ एमव्हीए असलेल्या दोन ट्रान्सफॉर्मर पैकी ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ ची क्षमता वाढवून त्याठिकाणी १० एमव्हीएचे नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे.

Board of Education : शिक्षण मंडळाचा शिक्षकांवर अविश्वास!

३३ केव्ही चांदुर बिस्वा उपकेंद्राची एकुण क्षमतेत वाढ झाली आहे. परिणामी वडेनर कृषी वाहिनीवरील १२०० शेतकऱ्यांना आणि वडनेर गावठाण वाहिनीवरील डीघा, वडनेर सानपुडी, बुर्टी, भिलवाडी, निम्भोडा,औरंगपूर गावतील घरगुती वर्गवारीतील ३५०० वाणिज्यिक आणि औद्योगिक व इतर वर्गवारीतील ११० ग्राहकांना तत्काळ दिलासा मिळाला आहे. शिवाय भविष्यात वाढणाऱ्या वीज ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठ्याची सोय झाली आहे.