The government has taken cognizance of this and formed an SIT : सरकारने याची दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे
Nagpur : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशींबाबत मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये दोन लाख बांग्लादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचले गेले. यासाठी बेकायदेशीर पद्धतीने जन्म दाखले तयार केले गेले, असा दावा सोमय्यानी केला आहे. ते शुक्रवारी (२४ जानेवारी) नागपुरात आले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.
रोहिंग्या बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळ्याअंतर्गत विविध जिल्ह्यांत जन्म दाखल्यांसाठी उशीरा अर्ज करणाऱ्यांची माहिती मिळवली आहे. यात धक्कादायक माहिती हाती आली. अनेक जणांनी तर ७० वर्षानंतर अर्ज केला आहे. वोट जिहाद अंतर्गत बांग्लादेशी रोहिग्यांना भारतीय नागरिक बनवण्याचे षडयंत्र रचले गेले. काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, दहशतवादी संघटना आणि बॉर्डरवरील दोन एजेंट यांनी हे षडयंत्र रचले आहे.
हा मोठा गेम प्लान आहे. सरकारने याची दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीने आपले काम सुरू केले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जन्मदाखले वितिरत करण्यात आले आहेत. मालेगावात दोन अधिकारी निलंबित झाले आहे. इतर जिल्ह्यांतील आणखी काही अधिकारी निलंबित होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
Prataprao Jadhav : स्वच्छता ठेवा आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या!
नागपूर जिल्ह्यातही ४ हजारांवर जन्म दाखले उशीरा सादर झाल्याचे सांगण्यात येते. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी सोमय्यांनी केली. आतापर्यंत ज्या १ लाख ७ हजार बांग्लादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले वितरीत केले. त्यांचा आणि ज्या ९० हजार लोकांच्या प्रमाणपत्रावर कारवाई सुरु आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी. त्यांना बांग्लादेशात परत पाठवण्यात यावे, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.