Breaking

Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रथमच बिनविरोध !

Zilla Parishad president and vice president elected unopposed first time in history : लायकराम भेंडारकर अध्यक्ष, सुरेश हर्षे उपाध्यक्ष

Gondia गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. शुक्रवारी (दि.२४) निवडणूक घेण्यात आली. यात भाजपचे गटनेता लायकराम भेंडारकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता आहे. भाजपचे ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि काँग्रेस १३ व २ अपक्ष असे जि.प. तील पक्षीय बलाबल आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यानंतर कार्यकर्त्यांनी जि.प.च्या आवारात जल्लोष केला.

Prataprao Jadhav : स्वच्छता ठेवा आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या!

जिल्हा परिषदेत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. अध्यक्ष पदासाठी भाजपकडून लायकराम भेंडारकर यांनी तर काँग्रेसकडून वंदना काळे यांनी अर्ज दाखल केला होता.

उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश हर्षे, भाजपचे पवन पटले, काँग्रेसकडून शशी भगत यांनी अर्ज दाखल केला होता. दुपारी ३:३० वाजता अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत काँग्रेसच्या वंदना काळे, भाजपचे पवन पटले व काँग्रेसचे शशी भगत यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपचे लायकराम भेंडारकर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडणुकीत जिल्ह्यातील आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, राजकुमार बडोले व संजय पुराम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. या निवडणुकीत कुठलाही दगा फटका होऊ नये, पक्षाच्या आदेशाचे पालन व्हावे, याची काळजी त्यांनी घेतली. निवडणूक पार पडेपर्यंत ते या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

Board of Education : शिक्षण मंडळाचा शिक्षकांवर अविश्वास!

विनोद अग्रवाल यांची चावी संघटना भाजपमध्ये विलीन झाल्याने व अपक्ष सदस्यांनीसुध्दा भाजपला समर्थन दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भाजपचे बळ वाढले. त्यामुळे भाजपने स्वबळावर जि.प. मध्ये सत्ता स्थापन करावी, असा सूर भाजपच्या सदस्यांकडून आळवला जात होता. पण, भाजपने अडीच वर्षांपूर्वीचे सूत्र कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह जि.प. मध्ये सत्ता स्थापन केली. यात माजी आमदार राजेंद्र जैन यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता विषयी समिती सभापतिपदांच्या निवडणुकीकडे सदस्यांंच्या नजरा लागल्या आहेत.