Breaking

Maharashtra State Biodiversity Board : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ कार्यालयात कर्मचाऱ्यांचा छळ !

The appointed officer is in the middle of controversy, the employees are in tension : नियुक्त केलेला अधिकारीच वादांच्या घेऱ्यात, कर्मचारी तणावात

Nagpur : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळात सद्यस्थितीत डीसीएफ डॉ. शिवबाला एस. यांची मनमानी सुरू आहे. सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. अशा परिस्थितीत कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. डॉ. शिवबाला यांनी अग्रवाल नामक निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. ही नियुक्तीच वादाच्या घेऱ्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येते. पण ती शासनाच्या नियमांचे पालन करून करावी लागते. पण अग्रवाल यांची नियुक्ती करताना डॉ. शिवबाला यांनी शासनाच्या नियमांची ऐसीतैसी केली असल्याचे सूत्र सांगतात. ही नियुक्ती करताना कोणतीही सार्वजनिक सूचना देण्यात आलेली नाही. जाहिरात काढण्यात आली नाही. अग्रवाल यांच्या नियुक्तीमुळे पात्र उमेदवारांना या संधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे.

Bachchu Kadu : हम चलते तो चिते की रफ्तार से, रोकने की तुम्हारी औकात नहीं !

नातेसंबंधांवर आधारित नियुक्त्या
डॉ. शिवबाला एस. यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून त्यांचे जवळचे व्यक्ती निवृत्त एसीएफ अधिकारी रवी अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचार आणि पदावरील गैरवर्तनासाठी अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जाणाऱ्या अग्रवाल यांच्या नियुक्तीमुळे असंतोष खदखदत आहे.

अग्रवाल हे तेच अधिकारी आहेत, ज्यांच्या विरोधात त्यांच्या मागील कार्यकाळात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. ते आता विद्यमान कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एखादा कर्मचारी लघुशंकेलाही गेल्या असल्यास त्याचा पाठलाग केला जातो. इतक्या खालच्या स्तराला अग्रवाल नामक अधिकारी गेले असल्याचे येथील कर्मचारी सांगतात. परिणामी कर्मचारी मानसीक तणावात वावरत आहेत. त्याचा कार्यालयातील कार्यसंस्कृतीवर वाईट परिणाम होत आहे.

Zilla Parishad school : मानधन मिळेपर्यंत शिक्षक रजेवर, विद्यार्थी वाऱ्यावर !

काम करण्याच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध
डॉ. शिवबाला एस. विद्यमान कर्मचाऱ्यांवर अवास्तव निर्बंध लादत आहेत. कामाच्या दरम्यानही, कर्मचाऱ्यांना विश्रांती किंवा आवश्यक विश्रांती घेण्याची परवानगी नाही. जर ब्रेक घेतला तर तो अत्यंत काळजीपूर्वक घेतला पाहिजे. कारण नंतर एखाद्याला फटकार आणि प्रचंड दबावाला सामोरे जावे लागते. जर ऑफिसमध्ये येण्यास थोडासाही उशीर झाला तर अर्धा दिवस काम किंवा पगार कपातीची माहिती दिली जाते. हे वर्तन हट्टीपणा, सहानुभूतीचा अभाव आणि वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती दर्शवते. याचा कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे.

पारदर्शकतेची मागणी
कार्यालयातील वातावरण विषारी होत चालले आहे. कार्यालयात पारदर्शकतेचा अभाव आणि अधिकाराचा गैरवापर यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि अविश्वास वाढत आहे. याचा परिणाम केवळ कार्य संस्कृतीवरच नाही तर महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या विश्वासार्हतेवरही होत आहे. छळमुक्त, गैरवर्तनमुक्त आणि निरोगी कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी निष्पक्ष भरती प्रक्रिया, कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कडक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.