Breaking

Amgaon Police : आमगाव पोलिसांनी रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर पकडले

Cases were registered against sand smugglers in the operation : कारवाईत रेती तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले

Gondia : आमगाव तालुक्यातील मानेकसा जंगल परिसरातील बाघनदी मुंडीपार घाटातून रोज रेतीचे उत्खनन सुरू होते. रेतीची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर २३ जानेवारी रोजी पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

बाघनदी मुंडीपार घाटातून रेतीचे अवैध उत्खनन करुन चोरी केली जात असल्याची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी सापळा रचला. विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली एम.एच. ३५-एफ- ३३०३ किंमत ७ लाख व ट्रॉली किंमत १ लाख ५० हजार, ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३५ ए.जे.०३४९, ट्रॉली एम.एच. ३५ एफ ४५१४ ट्रॅक्टर किंमत ७ लाख व ट्रॉली १ लाख ५० हजार, ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३५-ए.आर. ७६४२, ट्रॉली एम.एच. ३५ एफ ५०८१, एक ब्रास रेती किंमत ६ हजार ट्रॅक्टर किंमत ७ लाख ट्रॉली किंमत १ लाख ५० हजार.

‘Take off’ from Amravati to Mumbai soon : अमरावतीतून मुंबईसाठी लवकरच होणार ‘टेक ऑफ’ !

ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३५ ए.आर. ३००२, ट्रॉली एम.एच. ३५ एडब्ल्यू-५५७७ मध्ये एक ब्रास रेती किंमत ६ हजार, ट्रॅक्टर किंमत ७ लाख ट्रॉली किंमत १ लाख ५० हजार असा एकूण ३४ लाख १२ हजार तर २४ जानेवारी रोजी ट्रॅक्टर एम.एच. ३५ ए.आर. ३०३३ ट्रॉली नसलेला ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती किंमत ६ हजार, ट्रॅक्टर किंमत ७ लाख व ट्रॉली किंमत १ लाख ५० हजार रूपये असा एकूण ८ लाख ५६ हजारांचा माल जप्त केला. या दोन्ही कारवाईत ४२ लाख ६८ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

असा केला गुन्हा दाखल
दोन्ही दिवसांत कारवाईत रेती तस्करांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार खुशालचंद बर्वे करीत आहेत.

Birth-death certificate irregularity : जन्म नोंदीसाठी प्राप्त अर्जाची छाननी करा !

१२ जणांवर गुन्हा दाखल
२३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत आरोपी सनोज राजेंद्र मानकर (२४), रवींद्र श्रीराम मेश्राम (२६), अमन भुराजी भालाधरे (२७), हिरामन मोताराम मेश्राम (२४), संदीप मंगलुजी दखनकर (२९) हितेश रोशनलाल सुरसावत (२३), राजेश यशवंतराव तुरकर (३३) सर्व रा. मुंडीपार तर २४ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत आरोपी रवींद्र राधेश्याम सौंदरकर (४२), जितेंद्र रमेश देशमुख (३३), शंकर तेजराम देशमुख (४८), दीपक देवाजी अतकरी (३५), अशोक रामकिसन कावळे (४५) सर्व रा. लंबाटोला (गिरोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, पोलिस हवालदार मेश्राम, असिम मन्यार, पोलिस शिपाई विनोद उपराडे, चेतन शेंडे, भागवत कोडापे, नितीन चोपकर यांनी ही कारवाई केली आहे.