Breaking

Contaminated water : दूषित पाण्याचा धोका; आरोग्य विभागाचा पाणी न वापरण्याचा सल्ला

The Health Department took samples for biological and chemical testing of water : आरोग्य विभागाने घेतले पाण्याच्या जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी नमुने

Khamgaon : शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केसगळती आणि अन्य आजारांचे लोण बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा वैजिनाथ, घुई, माटरगाव, पहुरजिरा, निंबी आणि तरोडा कसबा या गावांमध्ये पसरले आहे. सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. यामुळे गावांतील पाण्याचा वापर करण्यासंबंधी संभ्रम वाढत चालला आहे.

आरोग्य विभागाने पाण्याच्या जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी नमुने घेतले. नागपूर प्रयोगशाळेत पाठवलेल्या तपासणीत हेवी मेटल्स, विशेषतः लेड (सिसं) आणि आर्सेनिकचे प्रमाण शोधण्यात आले. यामध्ये नायट्रेटचे प्रमाण १५४.०८ पीपीएम (निर्धारित मर्यादेच्या कितीतरी पटीने अधिक) आणि टीडीएस (क्षार) प्रमाण २११० पीपीएम असल्याचे निष्पन्न झाले.

Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचा घणाघात; म्हणाले, एसटीची दरवाढ ही तर गरीब जनतेची लूट !

आरोग्य विभागाच्या सूचना
तपासणी अहवालानुसार, पाण्याचा पिण्यासाठीच नव्हे तर अन्य उपयोगासाठीही टाळावा, अशी सूचना आरोग्य विभागाने केली आहे. अणूजीव तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालांची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी चावडीवर नोटिसा लावल्या जात आहेत. शिवाय, दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत हा संदेश पोहोचवला जात आहे.

समस्या वाढल्याने संभ्रम
गावातील पाणी स्रोत प्रामुख्याने बोअरवेल आणि विहिरींवर आधारित आहेत. मात्र, त्यामधील नायट्रेट आणि टीडीएसचे प्रमाण अत्याधिक असल्यामुळे पाणी आरोग्यास धोकादायक ठरत आहे. ग्रामस्थांमध्ये दूषित पाण्याचा वापर करावा की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांना योग्य माहिती मिळवण्यासाठी उपक्रम
डॉ. दीपाला बाहेकर, तालुका आरोग्य अधिकारी, शेगाव यांनी सांगितले, “पाण्याच्या नमुने तपासणीचे अहवाल चावडीवर नियमितपणे लावले जातात. ग्रामस्थांना योग्य माहिती मिळावी यासाठी हे उपक्रम सुरू आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj : नागपुरकरांना छत्रपती शिवरायांची वाघनखे पाहण्याची संधी

प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षीत
ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच सुरक्षित पाणी मिळवण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच या गावांमध्ये शुद्ध पाणी मिळेल अशी अपेक्षा करण्याची गरज आहे.