Breaking

Ex-Minister Vasant Purake: केंद्रातील भाजप सरकारकडून संवैधानिक संस्थांवर हस्तक्षेप

Interference on Constitutional Institutions by BJP Govt : माजी मंत्री वसंत पुरके यांचा गंभीर आरोप

Akola केंद्रातील भाजप सरकार सर्व संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करत आहे. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर दबाव आणत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते व माजी मंत्री वसंत पुरके यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुरके म्हणाले, “नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक झाल्या नाहीत. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशीनचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष देशभर ‘ईव्हीएम हटाव’ मोहिमेसाठी लढा उभारणार आहे.”

Congress Agitation against the Election Commission : कॉंग्रेसचा संविधानावर विश्वास नाही का?

स्थानिक स्वराज्य भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजीदखान पठाण, महा नगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महा सचिव प्रकाश तायडे, माजी महापौर मदन भरगड यांसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुरके यांनी भाजप सरकारवर संवैधानिक संस्थांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करण्याचा आरोप केला. “ईव्हीएम मशीन आम्हीच सुरू केली, पण भाजप सरकारने त्याचा गैरवापर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आम्ही करत आहोत. यासाठी काँग्रेस न्यायालयीन लढाई लढत आहे,” असे ते म्हणाले.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार भाजपप्रणीत असल्याचा आरोप पुरके करत पुरके म्हणाले, “२०१९ ते २०२४ या पाच वर्षांत मतदारसंख्या पाच लाखांनी वाढली होती, मात्र, अवघ्या सहा महिन्यांत ५० लाख मतदारांची वाढ कशी झाली, याचा खुलासा निवडणूक आयोग करू शकलेला नाही. ही बाब संशोधनाचा विषय आहे.”

Contaminated water : दूषित पाण्याचा धोका; आरोग्य विभागाचा पाणी न वापरण्याचा सल्ला

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष जिल्हा पातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात आहली. यामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत, सहभाग घेतला.