District Planning Committee dominated by the BJP; Bachchu Kadu supporters sidelined again : खासदार, आमदार, नामनिर्देशित सदस्यांचा समावेश
Akola अकोला जिल्हा नियोजन समितीच्या नव्या रचनेत पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार खासदार, आमदार आणि नामनिर्देशित सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांना यावेळीही स्थान मिळालेले नाही.
जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून रेखा राजत, विदुल सरप, अश्विन नवले, विजय देशमुख, अजय रामटेके, डॉ. अमित कावरे, गणेश तायडे आणि संतोष शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश सदस्य भाजपशी संबंधित असल्याने समितीवर भाजपचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Road accidents : बाळापूरमधील रस्त्यांची दुरवस्था; ७ वर्षांत ८५१ अपघात, ३३४ जणांचा मृत्यू
याआधीच्या कार्यकाळातही बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला विशेष निमंत्रित म्हणून प्रतिनिधित्व मिळाले होते. मात्र, सतत सत्तेत सहभागी असूनही त्यांच्या समर्थकांना नव्या समितीत स्थान न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे प्रहारच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांचा समितीत नामनिर्देशित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा सदस्य हे पदसिद्ध सदस्य म्हणून समितीवर कार्यरत राहणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या नव्या रचनेनंतर आगामी विकास निधीचे नियोजन आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








