व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ravi Rana, Balwant Wankhede : एक तरी ठोस विकासकाम दाखवा; मी तुमचा...

Ravi Rana, Balwant Wankhede : एक तरी ठोस विकासकाम दाखवा; मी तुमचा सत्कार करतो आणि बक्षीसही देतो

Ravi Rana asks MP Balwant Wankhade to account for the development works carried out over the past two and a half years : रवी राणांचे खासदार वानखडेंना खुले आव्हान, अडिच वर्षांतील विकासकामांचा मागितला हिशेब

Amravati अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सध्या आमदार रवी राणा आणि खासदार बळवंत वानखडे यांच्यातील शाब्दिक चकमकीची जोरदार चर्चा रंगली आहे. आमदार रवी राणा यांनी खासदार वानखडे यांना थेट आव्हान देत, “एक तरी ठोस विकासकाम दाखवा; मी तुमचा सत्कार करतो आणि बक्षीसही देतो,” असे जाहीर वक्तव्य केले आहे. या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात नव्याने खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राणा आणि वानखडे यांच्यातील राजकीय संघर्ष कायम असल्याचे या घडामोडींवरून पुन्हा स्पष्ट होत आहे. राणा यांच्या आव्हानानंतर अमरावतीतील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, कार्यकर्त्यांमध्येही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Bombay High Court : अकोला पश्चिम निवडणुकीची कागदपत्रे सुरक्षित ठेवा, न्यायालयाच्या आदेशांमुळे काँग्रेसचे आमदार अडचणीत

गेल्या अडीच वर्षांतील विकासकामांचा हिशेब मागत राणा यांनी नेमका कोणावर राजकीय निशाणा साधला आहे, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. हा वाद केवळ विकासकामांच्या मुद्द्यावर मर्यादित राहणार की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय संघर्षाची सुरुवात ठरणार, याकडेही लक्ष लागले आहे.

आता आमदार रवी राणा यांच्या या आव्हानाला खासदार बळवंत वानखडे कोणत्या पद्धतीने उत्तर देतात आणि या राजकीय शाब्दिक लढतीला पुढे कोणते वळण मिळते, याची उत्सुकता अमरावतीकरांना लागली आहे.

error: Content is protected !!