Breaking

Akash Fundkar अकोल्याच्या विकासासाठी राजराजेश्वरापुढे संकल्प

Focusing on Akola’s inclusive development : फुंडकर म्हणाले, परिसराचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध

Akola अकोला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व राज राजेश्वर मंदिर परिसराचा दर्जा उंचावण्याचा संकल्प पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केला. राज राजेश्वर मंदिराच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने राज राजेश्वर मंदिरात अभिषेक केला. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक, मातृशक्ती आणि समाजातील विविध स्तरांतील लोकांच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंनी दाखवून दिला ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा

राज राजेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी केलेल्या मागणीला फुंडकर यांनी पाठिंबा दिला. मंदिर परिसराच्या आराखड्याची पाहणी केली. माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार तयार झालेल्या आराखड्याला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी आमदार सावरकर यांच्यासोबत चर्चा करून मंदिर परिसराचा आढावा घेतला तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. राज राजेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला भाजप नेते विजय अग्रवाल, मंदिराचे विश्वस्त गजानन भाऊ धोगे, निलेश निनोरे, पप्पू वानखडे, सागर शेगोकार, सतीश ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय वेदपाठी ब्राह्मण लखन शर्मा, हेमंत शर्मा व संतोष शुक्ला यांनी मंत्रोच्चार केले.

Sudhir Mungantiwar : नाना-नानी पार्क कुटुंबांसाठी आनंद केंद्र बनेल !

सातकलमी कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी सातकलमी कृती कार्यक्रम आखला आहे. अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 1,02,176 पात्र शेतकऱ्यांना 643.36 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेत 20,512 लाभार्थ्यांना 89.49 कोटींची मदत मिळाली आहे.

रस्ते विकासाची कामे
अडीच वर्षांत 895 कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 91 कामे पूर्ण झाली आहेत. नवीन शासकीय इमारतींच्या बांधकामांसाठी मंजुरी मिळाली आहे. डाबकी रेल्वे उड्डाण पूल, कौटुंबिक न्यायालय व महिला आणि बालविकास भवन यासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.