व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Congress : काँग्रेसची नवी कार्यकारिणी ॲक्शन मोडमध्ये; जि.प.-पं.स. निवडणुकांसाठी ‘मिशन संघटन’!

Akola Congress : काँग्रेसची नवी कार्यकारिणी ॲक्शन मोडमध्ये; जि.प.-पं.स. निवडणुकांसाठी ‘मिशन संघटन’!

Akola congress newly formed body in action mode : ग्राम समित्यांपासून पंचायत मंडळांपर्यंत बांधणी; सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्याचा जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांचा निर्धार

Akola आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा काँग्रेस कमिटीने संघटनबांधणीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक शनिवारी जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत ग्राम समित्यांची उभारणी, पंचायत मंडळ समित्यांची पुनर्रचना, संघटन विस्तार आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसची नवी कार्यकारिणी आता निवडणुकीच्या तयारीसाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचे संकेत मिळाले.

सक्रिय कार्यकर्त्यांना योग्य स्थान

जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी अध्यक्षीय भाषणातून संघटन मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार असून संघटनेत सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे महासचिव विजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. पक्षातील प्रोटोकॉल आणि स्वयंशिस्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे तिरंगा आणि काँग्रेसच्या पंजाच्या दुपट्ट्याने स्वागत करण्यात आले. प्रदेश पदाधिकाऱ्यांसह आमदार ज्ञानदेवराव ठाकरे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले.

Sanjay Raut: भाजपला कधीच माफ करणार नाही; आमचा स्वाभिमान वेगळा, संजय राऊतांचा संताप

निवडणुकांसाठी कार्यक्रम निश्चित

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षाची भूमिका, ग्राम समित्यांची उभारणी, पंचायत मंडळ समित्यांची पुनर्रचना आणि संघटन विस्ताराच्या धोरणावर बैठकीत चर्चा झाली. आगामी काळातील विविध संघटनात्मक कार्यक्रमांचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले.

बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव महेश गणगणे, उपाध्यक्ष डॉ. निशान हुसेन, सचिव प्रशांत पाचडे, आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, ज्येष्ठ नेते डॉ. अशोक बिहाडे यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.

NCP sharad pawar : राष्ट्रवादीचे खासदार आज पंतप्रधान मोदींच्या भेटीत; शेतकरी, तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा की राजकीय खेळी?

यावेळी बाळासाहेब बोंद्रे, सारंग गाळी, विजय पचारे, प्रशांत देशमुख, डॉ. प्रमोद अरबट, विनोद आंबेडकर, कपिल डोके, गजानन अलाट, सुधाकर शिंदे, आनंदराव सोनटक्के, बाळापूर तालुकाध्यक्ष सत्यनारायण घाठोळे, मूर्तिजापूरचे राजू जोगदंड, तेल्हाऱ्याचे गजानन वानखडे आदींनी संघटनवाढीसंदर्भात आपली मते मांडली.

महेश गणगणे, महानगराध्यक्ष महेंद्र गवई, प्रशांत पाचडे, आमदार ज्ञानदेवराव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते डॉ. अशोक बिहाडे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!