व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nashik earthquake : भूकंपाच्या धक्क्याने नाशिक पुन्हा हादरलं !

Nashik earthquake : भूकंपाच्या धक्क्याने नाशिक पुन्हा हादरलं !

nashik-earthquake-3-4-magnitude-tremors-panic-among-citizens : ३.४ रिश्टर स्केलच्या धक्क्याने नागरिकांमध्ये घबराट

Nashik : नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज नाशिकमध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ठरावीक अंतराने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यापूर्वीही नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या भूगर्भीय हालचालींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नाशिक आणि गुजरातच्या परिसरात सध्या भूगर्भात विविध हालचाली सुरू असल्याचे भूकंप अभ्यासकांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी जमिनीत झिरपले असून, त्याचा भूगर्भातील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. तसेच टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे नाशिक परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे मत भूकंप अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

ठरावीक अंतराने भूकंपाचे धक्के जाणवणे ही काही अंशी सकारात्मक बाब आहे. मात्र भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Sudhir Mungantiwar : रानहत्ती व हिंस्त्र वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

गेल्या आठवड्यात शनिवारी रात्रीच्या सुमारासही नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या वेळी भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. या धक्क्यामुळे काही घरांमधील भांडी पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.

नाशिक शहरातील इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरात त्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले होते. शहरासोबतच जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातही भूकंपाचे कंपन जाणवले होते.

Farmers Agristack : सातबाऱ्यावर नाव नसले तरी शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ

गेल्या काही दिवसांत नाशिक परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज पुन्हा ३.४ रिश्टर स्केलचा धक्का जाणवल्याने ही चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, भूकंपाच्या वेळी नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे, इमारतीच्या आतील भागात असल्यास खिडक्या, काच आणि जड वस्तूंपासून दूर राहणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नाशिकमधील या वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि भूकंप निरीक्षण यंत्रणांच्या पुढील नोंदींकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!