व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ramai Awas Yojana : घरकुलाच्या निधीतून वाहन खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापर, आता...

Ramai Awas Yojana : घरकुलाच्या निधीतून वाहन खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापर, आता जुन्या फाइल्स उघडणार!

Vehicle purchased using funds from the Ramai Awas Yojana : २०१४-१५ मधील रमाई आवास योजनेच्या निधीच्या वापराबाबत गंभीर आक्षेप; अनुसूचित जाती कल्याण समितीच्या बैठकीत धक्कादायक बाबी समोर, चौकशीचे आदेश

Akola अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला निधी लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी खर्च होण्याऐवजी अन्य कामांसाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रमाई आवास योजनेच्या अनुदानातून वाहने खरेदी करण्यात आल्याचे, तसेच झोन दुरुस्तीच्या कामासाठीही निधी वापरण्यात आल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनुसूचित जाती कल्याण समितीच्या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. समितीचे प्रमुख आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रमाई आवास योजनेतील निधीच्या वापराबाबत गंभीर बाबी समोर आल्या. योजनेचा निधी पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वापरणे अपेक्षित असताना, त्याचा अन्य कारणांसाठी वापर झाल्याचे निदर्शनास आले.

Devendra Fadnavis: संविधानाची ताकद अन् युवकांच्या ऊर्जेने कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, फडणवीसांचा ‘जेन Z’ सोबत संवाद

लेखापरीक्षणात रमाई आवास योजनेच्या अनुदानातून वाहन खरेदी केल्याचे आढळून आले. तसेच झोन दुरुस्तीच्या कामासाठीही याच निधीतून खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यामुळे निधीच्या वापराबाबत समितीने संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागविली.

रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येते. योजनेचा निधी अन्य कामांसाठी वळविण्याचा प्रकार गंभीर असल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून निधीच्या खर्चाबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. निधी कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या मंजुरीने खर्च करण्यात आला, याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार थांबणार नाहीत!

२०१४-१५ मधील निधीच्या वापराबाबतचा हा प्रकार समोर आल्यानंतर जुन्या फाइल्सची तपासणी करण्यात येणार आहे. प्रशासकीय मंजुरी, खर्चाची बिले, वाहन खरेदीची कागदपत्रे आणि झोन दुरुस्तीशी संबंधित नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे या चौकशीतून निधीच्या गैरवापराचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!