बुलढाणा
Sanjay Raut destroyed Uddhav Thackeray’s ShivSena : पवार कुटुंबाने संबंध जोपासले आहेत
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा Buldhana येथील जनसंपर्क कार्यक्रम चांगलाच गाजला. पण त्याहीपेक्षा त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलेली टीका जास्त गाजतेय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचे ‘खरे श्रेय’ संजय राऊत यांना जात असल्याचे ते म्हणाले. ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी मनोमन प्रतिज्ञा केली होती. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे,’ अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.
पवार कुटुंबियांची राजकारणाची दिशा आणि विचार वेगळे आहेत. मात्र, तरीही ते आजपर्यंत कौटुंबिक संबंध जोपासत आले आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र येत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठ आणि 2 कुटुंबप्रमुख म्हणून पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी आशाताई पवार यांनी विठ्ठलाला साकडं घातलं असेल. त्याचा विचार शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवार Ajit Pawar करतील, असे ते म्हणाले.
गेल्यावेळी मंत्र्यांची संख्या कमी होती यावेळी ती वाढली आहे. येत्या दोन दिवसात सर्व मंत्री आपला पदभार स्वीकारतील. पालकमंत्रीपदेही लवकरच जाहीर होतील, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जनतेच्या तक्रारींचा ‘ऑन दि स्पॉट’ निकाल
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठाण मांडले. तेथे त्यांनी जनसंपर्काचा कार्यक्रम घेतला. लोकांना कळल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आजुबाजुला अधिकारी बसलेले होते. लोक येत होते आणि तक्रारी मांडत होते. जाधव यांनी जागच्या जागी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आलेल्या प्रत्येक तक्रारीचा निपटारा लावण्याची त्यांची स्टाईल दिवसभर चर्चेत होती.
नागरिकांना दिलासा
प्रतापराव जाधव यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या अडचणींसाठी त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ‘ऑन द स्पॉट’ निकाल लावला. मंत्री जाधव यांनी जनसंपर्क कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधले.