She always googled ways to die : ‘ऑनलाईन गेम’मुळे तरुणीची आत्महत्या
Nagpur ‘ऑनलाईन गेम’ खेळताना १७ वर्षीय मुलीला शेवटचा टास्क म्हणून स्वतःचा गळा चिरायचा होता. ती आत्महत्याच ठरणार होती. पण तरुणी तयार होती. तिने स्वतःचा गळा चिरून घेत आत्महत्या केली. आईला पहाटेच्या सुमारास मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. ही धक्कादायक घटना सोमवारी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांच्या पालकांना या घटनेने धडकी भरली आहे.
ही तरुणी बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. तिचे वडिल शासकीय बँकेत व्यवस्थापक आहेत. आईवडिलांना एकुलती असलेली तरुणी ही नेहमी मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होती. तिला अभ्यास करण्यासाठी विशेष खोली तयार करण्यात आली होती. ती अभ्यासात हुशार होती. विदेशी संस्कृतीवर नेहमी लिखाण करीत होती. तसेच ‘डेथ’ हा शब्द नेहमी गुगलवर सर्च करायची.
MLA Nitin Deshmukh : श्रेय लाटण्याचा काही लोकप्रतिनिधींचा डाव
ऑनलाईन गेम खेळणे वाढले होते. नेहमी अभ्यासातून वेळ काढून ती गेम खेळायची. ती गेल्या काही दिवसांपासून ‘डेथ ऑर लाईफ’ अशा प्रकारचा गेम खेळत होती. शेवटच्या टास्कपर्यंत पोहोचली. रविवारी कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीने चाकूने स्वत:चा गळी चिरुन आत्महत्या केली.
रोज पहाटे चार वाजता मुलगी अभ्यासासाठी उठते. मात्र, सोमवारी पहाटे मुलीच्या खोलीतून अलार्मचा आवाज येऊ लागला. त्यामुळे आईने खोलीत जाऊन बघितले. आई मोठ्याने किंचाळली. त्यामुळे वडिलही धावत तेथे आले. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात बघून दोघांच्याही तोंडातून आवाज निघत नव्हता. शेवटी कुटुंबियांनी धंतोली पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
Union Budget 2025 : मध्यमवर्गीयांच्या माफक अपेक्षा पूर्ण होतील का?
विदेशी संस्कृती यावर ती आपल्या ब्लॉगमध्ये लिखाण करायची. तिचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यास चांगला होता. युरोपीयन संस्कृतीबाबत तिने अनेकदा लिखाण केले आहे. ती नेहमी गुगलवर ‘मृत्यूनंतर काय?’ याबाबत माहिती सर्च करीत होती. तरुणीने आत्महत्या करण्यासाठी वापरेला चाकू हा ऑनलाईन ऑर्डर केला असावा. कारण, तो चाकू बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे आठवड्याभरापूर्वीच तिने आत्महत्येची पूर्वतयारी केली होती, अशी चर्चा आहे.