Dr. Ambedkar Law College memories brought to light : डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयातील आठवणींना दिला उजाळा
Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी कॅन्टिनच्या उधारीचा उल्लेख करताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हशा पिकला. त्याचवेळी टाळ्यांचा कडकडाटही केला.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमचे अनेक दिवस या महाविद्यालयात आणि मागच्या भागाला असलेल्या विद्यापीठाच्या वसतिगृहात गेले. येथील अनेक आठवणी आजही आमच्या मनात रुंजी घालत असतात. इथे मागे एक समोसेवाला होता त्याची उधारी आम्ही दिलेली आहे. पुढेही एक समोसेवाला होता, त्याचीही उधारी शिल्लक नाही. मिश्राजींच्या कॅन्टिनची उधारी देखील पूर्ण दिलेली आहे.’ मुख्यमंत्र्यांनी या आठवणींचा उल्लेख करताच उपस्थित माजी विद्यार्थ्यांना त्यांचे जुने दिवस आठवले.
Nagpur district congress: निलंबित राजेंद्र मुळक काँग्रेसच्या बैठकीत
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ. राजू हिवसे यांची प्रमूख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मी जे काही घडलो त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा वाटा खूप मोठा आहे. येथील गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाच्या बळावर एक आमदार ते मुख्यमंत्री असा प्रवास केला. कायदेमंडळाचा प्रतिनिधी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी मी विश्वासाने पार पाडू शकलो. कायदेमंडळाच्या प्रतिनिधीला कायदेविषयक संकल्पना अतिशय सुस्पष्ट माहित असणे आवश्यक असते. त्याबळावर आमदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला.’
Jaykumar Rawal : मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार !
उत्तम वकिलांची समाजाला गरज
लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्च्चव स्थान आहे. न्यायव्यवस्थेकडे सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालये व अनुभवी गुरुजनांची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
जयस्वाल माझा पिछा करत असतात
मंत्रिमंडळातील माझे सहकारी आशीष जयस्वाल कायम माझा पिछा करत असतात. या कॉलेजमध्ये ते माझे ज्युनियर होते. त्यानंतर विधानसभेत ते माझ्या सोबतच आले. प्रत्येक ठिकाणी एक वर्षाच्या अंतराने ते माझ्या सोबतच येत आहेत, अशी मिष्किलीही मुख्यमंत्र्यांनी केली.