Breaking

Youth Congress Controversy : पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी पोहोचली दिल्लीत!

Kunal Raut’s complaint to the High Command : प्रकरण तापले; कुणाल राऊत यांची हायकमांडकडे तक्रार

Nagpur युवक काँग्रेसच्या चार प्रदेश पदाधिकाऱ्यांचा उचलबांगडी करण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरून प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला असून थेट दिल्लीतच त्यांची तक्रार केली आहे.

उचलबांगडी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडेच कैफियत मांडली. या प्रकरणामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी परत उफाळून आली असून याचा फटका पक्ष संघटनेला बसण्याची शक्यता आहे.

सरसंघचालकांविरोधात आंदोलनादरम्यान अनुपस्थित असल्यामुळे ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले होते. मात्र यावरून वातावरण ढवळून निघाले. त्या पदाधिकाऱ्यांनी कुणाल राऊत यांचीच तक्रार केली व संघटनेने शिवराज मोरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली. हा राऊत यांच्यासाठी मोठा धक्का होता.

Co-operative Sector : सहकार दिंडीच्या आगमनाची बुलडाण्यात जय्यत तयारी

त्यातूनच बुधवारी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तनवीर अहमद, महासचिव अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवून कायमस्वरूपी निष्काशित करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी निष्कसनाचा आदेश काढला. चिकारा यांनी कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरून हे पत्र जारी केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन

या चौघांनाही मीडियाला बाईट दिला म्हणून कायमस्वरुपी निष्कासित करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या चौघांनीही याची तक्रार युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली आहे. त्यांना आता दोन दिवसानंतर दिल्लीत आपले म्हणणे मांडण्यास बोलावण्यात आले आहे. यामध्ये काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. युवक काँग्रेसच्या नियमानुसार कोणाला पक्षातून काढायचे असेल तर त्यापूर्वी पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे तक्रार करावी लागते. मात्र कुठलीही प्रक्रिया न राबविता थेट हकालपट्टी करणे ही मनमानी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.