Breaking

Dabhadi robbery case twist : दाभाडी येथील दरोडा प्रकरणाला कलाटणी

The murder was planned by the doctor husband himself : अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड; डॉक्टर पतीनेच रचला खेळ

Buldhana तालुक्यातील दाभाडी येथे कथित दरोड्याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. स्वतः डॉक्टर असलेल्या पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीच्या सख्ख्या नात्यातील २८ वर्षीय युवतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे हे हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बोराखेडी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बोराखेडी पोलिसांच्या माहितीनुसार, दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाडे (४२) यांचे पत्नीच्या सख्ख्या नात्यातील २८ वर्षीय युवतीसोबत मागील दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. संबंधित युवती वारंवार त्यांच्या घरी मुक्कामी राहत असे. तसेच डॉक्टरही तिच्या घरी नियमित ये-जा करत होते. या नात्याची सर्व मर्यादा ओलांडली गेली होती. डॉक्टरने तिच्यासोबत काही आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ तयार केले होते. परिणामी, युवतीने त्याच्यावर विवाहासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

Mahametro Nagpur : हिंगणा, कन्हानला मेट्रोची प्रतीक्षा!

१६ जानेवारीला डॉक्टरने मुलीच्या वाढदिवसानिमित्त भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संबंधित युवतीही उपस्थित होती आणि तिने पुन्हा विवाहाचा आग्रह धरला. यामुळे डॉक्टरने आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. १७ जानेवारी रोजी, त्याने पत्नी माधुरी टेकाडे (३५) यांना मुलीला शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिर्डीला पाठवण्याच्या बहाण्याने मलकापूर रेल्वे स्टेशनवर नेले. यावेळी त्याने मेडिकल स्टोअरमधून झोपेच्या गोळ्यांची खरेदी केली.

१८ जानेवारी रोजी दुपारी, आरोपी डॉक्टरने झोपेच्या गोळ्यांचा भुगा तयार करून तो माधुरी टेकाडे यांना अ‍ॅसिडिटीच्या औषधाच्या नावाखाली दिला. त्यामुळे त्या गाढ झोपल्या. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने हातमोजे घालून पत्नीच्या तोंडावर उशी दाबली आणि तिचे आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूची खातरजमा करण्यासाठी त्याने तिचे नाक व तोंड दाबले.

Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणाले ‘खेळा आणि कामही करा’!

या हत्येचा तपास चुकवण्यासाठी आरोपीने दरोड्याचा बनाव रचला. त्याने पत्नीच्या अंगावरील दागिने काढून लपवले, घरातील कपाट अस्ताव्यस्त केले आणि रोख रक्कम घरातच इतरत्र ठेवल्या. त्यानंतर त्याने स्वतः काही झोपेच्या गोळ्या घेतल्या, जेणेकरून तोही बेशुद्ध असल्याचा आभास निर्माण होईल.

१९ जानेवारीला सकाळी ही घटना उघडकीस आली. माधुरी टेकाडे मृतावस्थेत आढळल्या, तर आरोपी डॉक्टर बेशुद्ध होता. पोलिसांनी बारकाईने तपास केल्यानंतर घरातच लपवलेले रोख पैसे व दागिने सापडले. त्यामुळे दरोड्याचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Save Girl Child : एक हजार विद्यार्थी उतरले मैदानात!

बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, एसडीपीओ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे, बोराखेडी ठाणेदार सारंग नवलकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गुन्हा उघड केला. अद्याप मृतकाच्या अंगावरील सर्व दागिने पोलिसांना सापडलेले नाहीत. तसेच या गुन्ह्यात इतर आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार करत आहेत.