Action taken against Bazar Committee Chairman, Deputy Chairman for taking bribe : जिल्हा उपनिबंधकांनी ठेवला पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका, दाखविला घरचा रस्ता
Akola जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबास), तेल्हाराचे सभापती सुनील इंगळे आणि उपसभापती प्रदीप ढोले यांनी बाजार समिती सदस्य पदाचा दुरुपयोग केला. याप्रकरणी त्यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ चे कलम ४५ (१) नुसार समिती सदस्य पदावरून निष्कासित करण्यात आले आहे.
हा आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला डॉ. प्रवीण लोखंडे यांनी ३० जानेवारी रोजी पारित केला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला येथे कृउबास तेल्हाराचे संचालक संदीप रमेशराव खारोड व इतर ९ संचालकांनी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्ज दाखल केला होता.
Wardha DPC meeting : ४१६.५८ कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १७, कलम ४५ (१) आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समिती निवडणूक) नियम २०१७ मधील नियम १० (१) (आय), १० (१) (के) व १० (३) अंतर्गत हा अर्ज दाखल करण्यात आला होता.
यामध्ये गैरअर्जदार तेल्हारा कृउबासचे सभापती सुनील मोतीराम इंगळे, उपसभापती प्रदीप मधुकर ढोले आणि प्रभारी सचिव यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा येथील शासकीय धान्य खरेदी केंद्र चालू असताना त्या केंद्रावरील हमालीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल अदा केले.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘वाद नाहीत तर संमेलन कसले!’
हमालीचे बिल अदा करताना या तिघांनी पदाचा गैरवापर करून बाजार समितीच्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराकडून लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईत सभापती सुनील इंगळे आणि उपसभापती प्रदीप ढोले हे लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले.
तपासात दोषी आढळल्यामुळे दोघांना पदावरून काढून टाकण्यात आले. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांनी ३० जानेवारी रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे.