Political conflict over bus stop vandalism : भाजपचा काँग्रेसवर आरोप, काँग्रेसचे खंडन
Buldhana चिखली मतदारसंघातील सोनेवाडी येथील बस थांब्याच्या तोडफोडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने काँग्रेस कार्यकर्त्यांवर प्रवासी निवारा नासधूस केल्याचा आरोप केला होता. मात्र, युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेससाठी ग्रामीण आणि शहरी भागात अनेक ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र, चिखली मतदारसंघात नव्याने बांधण्यात आलेले काही प्रवासी निवारे चुकीच्या ठिकाणी उभारल्याने ते प्रवाशांसाठी निरुपयोगी ठरत आहेत, अशी तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. या बांधकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही नागरिकांकडून होत आहेत.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा!
दरम्यान, सोनेवाडीतील प्रवासी निवाऱ्याची तोडफोड काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झाल्याचा दावा काही माध्यमांद्वारे केला गेला. मात्र, काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावत संबंधित व्यक्ती पक्षाचा कार्यकर्ता किंवा सदस्यही नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चुकीची माहिती पसरवून बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
CM Devendra Fadnavis : गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
भाजपने काँग्रेसवर प्रवासी निवाऱ्याची तोडफोड केल्याचा आरोप केला. त्यानंतर युवक काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत भाजपवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. प्रवासी निवाऱ्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा स्थानिक नागरिकांचा आक्षेप आहे. बस थांब्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.








