Breaking

Rahul Bondre : विस्तापितांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने सोडवा

Resolve the issue of livelihood of displaced people urgently : काँग्रेसतर्फे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana चिखली शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्या सोडवा. अतिक्रमण हटविलेल्या विक्रेत्यांच्या रोजगार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावा. आदी मागण्यांसाठी चिखली काँग्रेसच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्याशी चर्चा केली. तसेच तातडीने तोडगा काढण्याचा सल्ला दिला. उपाय न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

नगर परिषदेकडून दोन-अडीच महिन्यांपूर्वी राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अपूर्ण व पक्षपाती असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. मोहिमेनंतर विस्थापित झालेले डी. पी. रोडवरील भाजीपाला विक्रेते, फेरीवाले आणि फळ विक्रेते यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. हातातून रोजगार गमावल्याने या कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच अन्य नागरी समस्या देखील प्रलंबित आहेत.

BJP Congress : बस थांब्याच्या तोडफोडीवरून राजकीय संघर्ष

चिखली काँग्रेसने दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. नगर परिषदेने प्रस्तावित केलेली करवाढ तात्काळ स्थगित करावी, कारण ती नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. शहरातील अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. विविध प्रभागांमध्ये साचलेली घाण आणि नाल्यांची सफाई तातडीने करावी, जेणेकरून साथीचे रोग पसरू नयेत. चालू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता तपासावी आणि रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.

शहरातील प्रशस्त रस्त्यांवर अनधिकृतपणे पडलेल्या बांधकाम साहित्य आणि नादुरुस्त वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांवर कारवाई करावी. मोकाट जनावरे आणि अवजड वाहनांमुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवण्यासाठी उपाययोजना करावी. सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची देखभाल आणि साफसफाई नियमित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

कचरा संकलनासाठी नेमण्यात आलेल्या घंटा गाड्यांचे वेळापत्रक नियमित करावे. नगर परिषदेच्या विविध विभागांमध्ये बेकायदेशीर दलाली रोखावी आणि पारदर्शक कारभार सुनिश्चित करावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव टाळावा आणि प्रभावित झालेल्या विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करावी, असे म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis : गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिकी काकडे, नंदुभाऊ सवडतकर, कुणाल बोंद्रे, प्रा. निलेश गावंडे, प्रा. राजू गवई, सचिन बोंद्रे, प्रदीप पचेरवाल, शहेजादअली खान, रफिक सेठ, आशिफ भाई, विजय गाडेकर, गोपाळ देव्हडे यांच्यासह शेकडो भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले आणि छोटे व्यावसायिक उपस्थित होते.