Breaking

Prataprao Jadhav : 64 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचं घरकूल

64 thousand families will get their own house : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश

Buldhana केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील ६४ हजार कुटुंबांना हक्काचं घरकुल मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्याला सन 2025 -26 साठी 64155 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 64 हजार कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.

प्रत्येकाला आपलं सुंदर असं घर असावं अशी मनोमन इच्छा असते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना घराचं स्वप्न साकारता येत नाही. पण अशा गरजूंना केंद्र सरकारच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यावर निर्णय झाला असून या गावांमधील लोकांना आता हक्काचं घर मिळणार आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा!

बुलढाण्यासाठी 4651, मोताळा 4227, चिखली 8213, मेहकर 8208, लोणार 3596, सिंदखेड राजा 6252, देऊळगाव राजा 2827, खामगांव 7149, शेगाव 2342, मलकापूर 3432, नांदुरा 4808, जळगांव जामोद 3976 आणि संग्रामपूर तालुक्यासाठी 4474 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे एकाच आर्थिक वर्षात 64155 कुटुंबांना आता स्वतःचे , हक्काचे घर मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत एव्हढ्या मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुलडाणा जिल्ह्याला आतापर्यंत एवढ्या मोठ्या घरकुलांचे उद्दिष्ट कधीच मिळाले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील घरकुलांची प्रतीक्षा यादी ही 1 लाख 12 हजार एव्हढी आहे. दरवर्षी कमी उद्दिष्ट प्राप्त होत असल्याने प्रतीक्षा यादी हळूहळू कमी होत होती. या वर्षी पहिल्यांदाच मोठी उद्दिष्ट प्राप्ती झाल्याने प्रतीक्षा यादी अर्ध्यावर येणार आहे.

उर्वरित प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना पुढील वर्षी पर्यंत लाभ देऊन 100% प्रतीक्षा यादीमधील कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रतीक्षा यादी प्रमाणे याचा लाभ मिळणार आहे. तालुका स्तरावरून ग्राम पंचायतस्तरावर ही थेट उद्दिष्ट दिलेले असल्याने ग्राम पंचायतीना मिळालेल्या घरकुलांच्या उदिष्टाप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ द्यावा लागणार आहे.

Sudhir Mungantiwar : भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प

आवश्यक ती कागद पत्रे, आणि अटी व शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शिल्लक राहिलेल्या कुटुंबांना घरकुले मिळणार आहे. अशात कुणीही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन देखील केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.