Breaking

DGCA is positive : गोंदिया-इंदूर विमानसेवा मार्चपासून?

 

Gondia-Indore flights from March? : प्रस्तावाला ग्रीन सिग्नल; डीजीसीएने दाखवली अनुकुलता

Gondia गोंदियातील विमानतळावरून थेट इंदूरची सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने DGCA अनुकुलता दाखवली आहे. पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर मार्चपासून ही सुविधा सुरू होऊ शकते, असा विश्वास व्यक्त होत आहे.

तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती प्रवासी विमान सेवा सुरु आहे. याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आता या विमानतळावरुन गोंदिया-इंदूर या मार्गावर प्रवासी विमानसेवा मार्चमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. याला डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हीएशनने DGCA ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : नाफेड खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या

 

गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांना सुध्दा याचा लाभ होणार आहे. बिरसी विमानतळारुन १ डिसेंबर २०२३ पासून इंडिगो विमान कंपनीने गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या प्रवासी विमानसेवेला प्रारंभ केला. गेल्या वर्षभरापासून ही सेवा सुरळीतपणे सुरु आहे. या प्रवासी विमानसेवेचा गेल्या वर्षभरात ३३ हजार प्रवाश्यांनी लाभ घेतला आहे.

प्रवासी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इंडिगो विमान कंपनीने आता गोंदिया-इंदूर या मार्गावर सेवा सुरु करण्यासाठी डीजीसीएकडे प्रस्ताव ठेवला होता. त्याला त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मार्च महिन्यात या मार्गावर प्रवासी विमान सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. गोंदिया येथे रेल्वे जक्शंन तसेच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्य लागून असल्याने प्रवाशांची सातत्याने वर्दळ असते. जलद सेवेसाठी अनेक प्रवासी आता विमानसेवेला प्राधान्य देतात.

Terrible reality of the education system : आठवीच्या विद्यार्थ्यांना येत नाही दुसऱ्या वर्गाचं गणीत!

 

गोंदिया विमानतळावरुन मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सुध्दा प्रवासी विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली गेल्या वर्षीपासून सुरु आहेत. पण त्याला अद्याप डीजीसीएची परवानगी मिळाली नसल्याची माहिती आहे. गोंदिया-इंदूर प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक शफीक शहा यांना विचारणा केली असता अद्याप यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.