40 Gram Panchayats mobilized for the ‘Matoshree’ scheme : इमारत बांधणी योजना; शासनाकडे प्रस्ताव पाठवला
Wardha देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागाचे महत्त्वाचे स्थान आहे. ग्राम समृद्ध तर देश समृद्ध समजला जातो. त्यामुळे गावगाड्याचा कारभार आता अडगळीतील इमारतीतून नाही. तर सुसज्ज इमारतीतून व्हावा, म्हणून शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजना अंमलात आणली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या इमारती साकार व्हाव्यात याकरिता ४० ग्रामपंचायतींचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत एकूण ५२१ ग्रामपंचायती आहेत. गावगाड्याचा कारभार चालविण्यासाठी या इमारतीची महत्त्वाची भूमिका असल्याने ग्रामपंचायतीची इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातून निधी दिला जातो. आता त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेने भर घातली आहे.
Nitin Gadkari : आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर होणे गरजेचे
ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही किंवा ज्या ग्रामपंयायतींची इमारत जीर्ण झाली आहे, पडझड झाली आहे, अशा ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी दिला जातो. याकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून ४० ग्रामपंचायतींचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून प्राप्त झाली आहे.
या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि १ ते २ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख निधी मंजूर करण्यात येतो. या निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून, १० टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावरदेखील इमारत उभारता येणार आहे. २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येईल.
Chandrashekhar Bawankule : आधी सांडपाण्याची व्यवस्था नंतरच रस्ते
ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही किंवा जुन्या इमारतींची पडझड झाली आहे अशा ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून २० ते २५ लाखांचा निधी दिला जातो. याकरिता काही नियम व अटींचा समावेश आहे.
ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाकरिता सन २०१९-२० मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तळणी (खंडेराव), सहेली, मदना व मोई या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आता या ग्रामपंचायतींच्या कामाला सुरुवात होणार आहे.
CM Devendra Fadnavis : मृत्यूशी झुंज देणाऱ्या आदिवासी युवकाला मुख्यमंत्र्यांचा आधार
या योजनेतून ग्रीन बिल्डिंग संकल्पना अंमलात आणून नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन केले जाणार आहे. पाण्याचा व ऊर्जेचा काटकसरीने वापर करून जलपुनर्भरण आणि जास्तीतजास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामग्रीचा वापर करावा लागणार आहे.