Breaking

CM Devendra Fadnavis : आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण

Comprehensive Policy for Tribal Health : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द; एम्स येथील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Nagpur एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची उत्तरे, तज्ज्ञांच्या सूचना याला अधोरेखित केले जाईल. आणि आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : आधी सांडपाण्याची व्यवस्था नंतरच रस्ते

या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मुलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हजारो वर्षांपासून आदिवासी समाजाने आपल्या उपजत ज्ञानाच्या आधारावर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली. मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार केल्यास. त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मुलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रशासनातर्फे अनेक विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू यात असे आवाहन त्यांनी केले.

CM Devendra Fadnavis : मृत्यूशी झुंज देणाऱ्या आदिवासी युवकाला मुख्यमंत्र्यांचा आधार

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी नागपूर शहराची स्थापना केली. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. त्यामुळे आपण योग्य ठिकाण निवडले, असे ते म्हणाले.