व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Hair Loss disease : केस गळालेल्यांना धीर देण्यासाठी स्वतःच केले मुंडन!

Hair Loss disease : केस गळालेल्यांना धीर देण्यासाठी स्वतःच केले मुंडन!

A unique initiative by youth to encourage patients : रुग्णांना धीर देण्यासाठी तरुणांचा अनोखा उपक्रम

Khamgao शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे ३० रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे रुग्णांचे मनोबल खचू नये, यासाठी गावातील युवकांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी स्वतःचे मुंडन करून रुग्णांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

गावकऱ्यांनी दाखवलेली ही एकजूट रुग्णांच्या मनोबल वाढीसाठी महत्त्वाची ठरली आहे. बोंडगावसह शेगाव तालुक्यातील बारा गावांमध्ये गेल्या महिनाभरात केस गळतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आरोग्य विभागाने या घटनेच्या तपासासाठी विशेष मोहीम राबवली असून, विविध शाखांचे अधिकारी कारणांचा शोध घेत आहेत.

Fifteenth Finance Commission : दोन महिन्यांत खर्च करायचे आहेत १३४ कोटी!

 

अद्याप या समस्येचे ठोस निदान झालेले नसल्यामुळे उच्चस्तरीय आरोग्य पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून अहवालाची प्रतीक्षा असून, आरोग्य प्रशासन आणि गावकरी दोघेही या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, युवकांच्या या सकारात्मक उपक्रमामुळे रुग्णांना आत्मविश्वास मिळत आहे. समाजात एकता आणि सहकार्याचे उदाहरण निर्माण झाले आहे.

या युवकांनी केले टक्कल
बोंडगावातील युवकांनी आपल्या गावातील रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतःहून टक्कल करून घेतले आहे. या उपक्रमात पुढील युवकांनी सहभाग घेतला. विनायक इलामे ,आदर्श अंदुरकर, सोपान जुमळे, संजय बोरसे, रामा थारकर, प्रवीण थारकर, प्रदीप कळसकर, ओम थारकर, प्रणव थारकर आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे.

Mahayuti Government : ३५ महाविद्यालयांमध्ये ‘चाणक्य’ केंद्र!

ICMR च्या अहवालाची प्रतीक्षाच
भारतीय वैद्यकिय संशोधन परिषद अर्थात ICMR दिल्ली आणि चेन्नई चे पथक शेगांव येथे दाखल झाले हाेते. या विशेष पथकामध्ये डॉ.मनोज मुऱ्हेकर (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नई) , डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ सुमित अग्रवाल (ICMR, नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) ,डॉ राज तिवारी (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ, भोपाळ) , डॉ सुचित कांबळे (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) यांचा या विशेष पथकामध्य यांचा समावेश हाेता़ त्यांनी रुग्णांचे रक्ताचे नमुने तसेच पाण्याचे नमुने संकलीत केले हाेते. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षाच आहे.

error: Content is protected !!