Degrees will be awarded to 4 thousand 40 graduates : राज्यपालांच्या उपस्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
Akola डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ उद्या (५ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत एकूण ४,०४० विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
या समारंभाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच विद्यापीठाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहतील.
समारंभात अडीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यांसह बी. टेक (अन्न तंत्रज्ञान), बी. बी. ए. (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) अशा विविध शाखांमध्ये पदव्या प्रदान केल्या जातील.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात ४७५ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. (कृषी, उद्यानविद्या, वनविद्या), एम. टेक (कृषी अभियांत्रिकी), एम. बी. ए. (कृषी) या पदव्या प्रदान केल्या जातील. तसेच, २५ संशोधकांना कृषी, उद्यानविद्या व कृषी अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. प्रदान केली जाईल.
विद्यापीठाने करडई, हरभरा, सोयाबीन, जवस या पिकांची सहा नवी वाण विकसित केली असून, ‘सुपर जॅकी’ हे सोयाबीन वाण विदर्भात मोठ्या प्रमाणावर पेरले जात आहे.
Wardha Crime : महागड्या दुचाकी चोरायचे; चोरट्यांना नागपुरात अटक
विद्यापीठात दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी ‘हॉर्टिकल्चर डे’ निमित्त थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरूंनी विद्यापीठाच्या बीजोत्पादन कार्यक्रम, भाजीपाला संशोधन, सहिवाल गाय संगोपन आदी उपक्रमांची माहिती दिली.