Breaking

Chandrashekhar Bawankule : राज्यभरात पांदण रस्त्यांचा नागपूर पॅटर्न

Nagpur pattern of Panand roads across the state : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश

Nagpur राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पांदण रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात अडचण येत आहे. अशात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांन नागपूर पॅटर्न राबविण्याची सूचना केली आहे. नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पांदण रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून आपापल्या जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे पावले उचलावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पांदण आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. राज्यातील सर्वच शिव पांदण आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करा. त्यानंतर त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा, अशी सूचना प्रशासनाला त्यांनी दिली.

Union Budget : अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून किसान सभेचा निषेध !

पालकमंत्र्यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करावी. त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पांदण रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पांदण रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल. अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करुन नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा सीसीटीव्हीवरून कठोर पवित्रा !

तसेच शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये, यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता नागपूर पॅटर्न राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येतो की अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय अडचणींचे कारण देत वेळकाढूपणा करण्यात येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.