Devendra Fadnavis Krushna Khopde : खोपडेंची मागणी मंजूर; नागपुरात आणखी एक Police station!

CM’s green signal to the demand of Bhandewadi Police Station: मुख्यमंत्र्यांनी दिला निर्णय; भांडेवाडीतील गुन्हेगारीला बसणार चाप

Nagpur उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा विधीमंडळात दरवेळी गाजत असतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात आणखी एक पोलीस ठाणे स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या पोलीस ठाण्याची मागणी सातत्याने सरकारदरबारी लावून धरली होती.

२००९ अगोदर पूर्व नागपुरात लकडगंज, नंदनवन, कळमना अशी तीनच पोलिस ठाणे अस्तित्वात होती. प्रत्येक पोलिस स्टेशनची हद्द फार मोठी आहे. यात ग्रामीण भागाचासुद्धा समावेश असल्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास पोलिसांची दमछाक होत होती. सन २०१४ नंतर वाठोडा, पारडी, शांतीनगर अशी तीन पोलिस ठाणी निर्माण झाली. खोपडे यांनी भांडेवाडी, गरोबा मैदान व रमणा मारोती अशी तीन पोलिस ठाणी निर्माण करण्याची मागणी केली होती.

FDA’s authority removed : FDA चे अधिकार काढले; शहराचे आरोग्य धोक्यात!

त्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार भांडेवाडी पोलिस ठाण्याला मंजुरी मिळाली होती. आता गृह मंत्रालयाने गरोबा मैदान पोलिस ठाण्याला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात शासन निर्णयदेखील जारी करण्यात आला आहे. या ठाण्याची हद्दनिश्चिती झाल्यावर ते नागरिकांच्या सेवेत येईल. गरोबा मैदान पोलिस ठाण्याच्या रूपाने शहराला ३६ वे पोलिस ठाणे मिळणार आहे.

लकडगंज व नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीला विभागून हे नवीन पोलिस ठाणे तयार होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ६५ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती खोपडे यांनी दिली. या पोलिस ठाण्यात दोन पोलिस निरीक्षक, अन्य १४ पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.

Chandrashekhar Bawankule : या निर्णयाने मिळणार उद्योगांना Boost!

त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतूनच पोलिसांचा ताफा देण्यात येणार आहे. गरोबा मैदान परिसर हा लकडगंज आणि नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत होता. मात्र, पोलिसांना जवळपास चार ते पाच किमीचा फेरा घेऊन घटनास्थळावर पोहोचावे लागत होते. या पोलिस ठाण्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.