Breaking

Mahayuti Government : गरिबांच्या मुलांसाठी ‘सीएमश्री शाळा’!

CMShree school for children of the poor : स्मार्ट क्लासरूममध्ये शिक्षण घेणार

Wardha मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात शाळांसाठी ”पीएमश्री” च्या धर्तीवर ”सीएमश्री” शाळांची योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने ३१ जानेवारीपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश होते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्मार्ट क्लासरूममध्ये शिक्षण घेणार आहेत.

‘सीएमश्री’ योजनेंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे. खासगी शाळांप्रमाणे वातावरण निर्माण केल्याने शासकीय शाळेत विद्यार्थी संख्या वाढविण्याचा उद्देश या अभियानातून करण्यात येणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. केंद्रीय शाळांची फेरसंरचना २०२४-२५ मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार आता पीएमश्री धरतीवर केंद्रीय शाळांना सीएमश्री शाळा म्हणून निवड करायची आहे.

Animal Husbandry Department on ‘alert mode’ : बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी Rapid Response Team!

या शाळांची निवड करताना त्या केंद्रातील शाळा, केंद्र शाळा, आदर्श शाळा किंवा पीएमश्री शाळा योजनेत अंतर्भूत असल्यास या केंद्राकरिता सीएमश्री शाळा प्रस्तावित करण्यात येऊ नये, असे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सीएमश्री पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्ह्यातील शाळांना दिले आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आता पीएमश्री योजनेच्या धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये सीएमश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेंतर्गत गुणवत्ता यावर भर देण्याचा शासनाचा मानस आहे. शाळेभोवती मजबूत भिंत आणि चांगल्या वर्गखोल्या बांधणे, चांगली स्वच्छतागृहे, खेळाचे मैदान बनविणे, प्रयोगशाळा बांधणे, संगणक कक्ष उभारणे, विविध विषयाचे व्यवहारिक ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आदी गोष्टीची पूर्तता या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Devendra Fadnavis Krushna Khopde : खोपडेंची मागणी मंजूर; नागपुरात आणखी एक Police station!

राज्यात पीएमश्रीच्या धर्तीवर सीएमश्री शाळांची निवड केली जाणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख होती.

केंद्र शाळा निवडताना ती इतर शाळांसाठी दळणवळण सोयीयुक्त असावी. संबंधित शाळेत आवश्यक त्या भौतिक सुविधा असाव्यात, विकसित करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी. सीएमश्री शाळांमध्ये समग्र अभियानांतर्गत बालवाटिका, डिजिटल क्लासरूम, प्रशिक्षित शिक्षकांची व्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षक आदी गोष्टींची पूर्तता करून मुलांच्या शिक्षणाची गरज भागविली जाणार आहे.

Chandrashekhar Bawankule : राज्यभरात पाणंद रस्त्यांचा नागपूर पॅटर्न

या शाळेमध्ये गरीब, श्रीमंत असा भेदभाव न बाळगता सर्वांना शिक्षण दिले जाणार आहे. केंद्र शाळा निवडताना ती इतर शाळांसाठी दळणवळण सोयींनीयुक्त असावी. ‘पीएमश्री’ च्या धर्तीवर ‘सीएमश्री’ शाळांची निवड केली जाणार आहे; मात्र ज्या शाळांनी पीएमश्री योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना सीएमश्री योजनेचा प्रस्ताव पाठविता येणार नाही.