Uday Samant still stands firm on ‘that’ statement : म्हणाले, ऑपरेशन टायगर सक्सेस होणार
Nagpur : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर ठाकरेंची वाताहत झाली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेने चांगले यश मिळवले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेला घरघर लागल्याचे बोलले जात आहेत. त्यातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंची शिवसेना फुटणार असल्याचे विधान केले होते. आजही ते त्या विधानावर ठाम आहेत.
आज (7 फेब्रुवारी) मंत्री उदय सामंत यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ऑपरेशन टायगरबद्दल विचारले असता, ते म्हणाले, असे कुठलेही मिशन हे सांगून राबवले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं. त्याकरिता मिशन राबविण्याची गरजच नाही. तर काही लोकांना कळून चुकलंय की बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार, हेसुद्धा निश्चित आहे.
Gajendra Singh Shekhawat : पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करेल ‘ओटीएम 2025’
90 दिवसांत उद्धव ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या 10 ते 12 माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार असं मी सांगितलं होतं. त्यावर मी आजही ठाम आहे. त्यांना कळून चुकले आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांचा पक्ष संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहे, असेही उदय सामंत म्हणाले.
एसटीच्या विभाग अध्यक्ष पदाबाबत ते म्हणाले की, याबाबत परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या ऑफरबद्दल विचारले असता, विजय वडेट्टीवार माझे राजकारणाच्या पलीकडचे चांगले मित्र आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे लोक मात्र चांगले नाहीत.
आपल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात काय वाद सुरू आहेत. ते अगोदर त्यांनी सोडवले पाहिजे. उदय सामंत सोबत किती आमदार आणि आमच्या पक्षात काय चाललंय हे त्यांनी पाहू नये. मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारणात आलो आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कोणताही त्रास होईल, अशी कृती आमच्याकडून होणार नाही. आम्ही बालिश नाही, त्यामुळे बालिश राजकारण कोणी करू नये, असा टोला सामंत यांनी लगावला.
Chandrashekhar Bawankule : राज्यभरात पांदण रस्त्यांचा नागपूर पॅटर्न
गुलाबराव पाटील काय म्हणाले आणि त्यांना नेमकं म्हणायचं काय, हे त्यांनाच विचारलं पाहिजे. कारण त्यांची माझी भेट झाली नाही. त्यांच्याशी चर्चा केल्यावर मी काहीतरी सांगू शकेन. जितेंद्र आव्हाडांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यावर न्यायालयात एखादी बाब चालू असताना त्यावर बाहेर भाष्य आणि ट्विट करणे योग्य नाही. न्यायिक व्यवस्थेवर कायम आक्षेप घ्यायचा आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेणे ही काही लोकांची फॅशन बनली आहे. त्यामुळे त्यावर मला जास्त बोलायचं नाही, असे उदय सामंत म्हणाले.
लाडकी बहीण योजनेत जे काही नियम दिले गेले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये घट झाली आहे. अनावधानाने किंवा नजरचुकीने आलेल्या बहीणी कमी झाल्या आहेत. सरसकट लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. एडवांटेज विदर्भ मध्ये 15 कोटी 70 लाख रुपयांचे प्रकल्प विदर्भात आले आहे. विदर्भात भविष्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. ही शाश्वत गुंतवणूक आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे सांगताना शिवभोजन थाली बंद होणार नाही, असा विश्वासही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.