Breaking

Minister Indranil Naik : आदिवासी विकास राज्यमंत्री रमले विद्यार्थ्यांमध्ये!

Minister of State for Tribal Development interacts with students: इंद्रनिल नाईक यांचा ‘संवाद चिमुकल्यांशी’; हिंगणा तालुक्यातील शाळेला भेट

Nagpur दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे Dada Bhuse यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मुलांना कविता समजावून सांगितली होती. आता आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी देखील हिंगणा तालुक्यातील एका शाळेत भेट दिली. ते सुद्धा आपल्या शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले होते.

महायुती सरकारची दुसरी टर्म सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी सर्व मंत्र्यांना शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला. यात त्यांनी प्रशासनाला लोकांपर्यंत जाण्याचे निर्देश दिले. एसी कॅबिनमध्ये बसून राहण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेण्याच्या सूचना केल्या. त्याचा परिणामही झाला. पण अधिकारी स्वतःहून हे करणार नाहीत, याची जाणीव मंत्रिमंडळाला असावी. म्हणून मंत्रिमडळ स्वतःच पहिले यावर अंमल करताना दिसत आहे.

CM Devendra Fadnavis : प्रकल्प पूर्ण करता की, करार रद्द करू?

दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या एका शाळेला व जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली होती. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह राज्यमंत्री व अधिकाऱ्यांनी एक रात्र आश्रमशाळेत मुक्काम ठोकला. आता आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी सुद्धा एका शाळेला भेट दिली.

इंद्रनील नाईक यांनी आज हिंगणा तालुक्यातील कवडस येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना ते देखील जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत, असे दिसत होते. विशेष म्हणजे राज्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल सोडला. ते स्वतः मांडी घालून विद्यार्थ्यांसोबत खाली बसले आणि त्यानंतर त्यांचे अनुभव जाणून घेतले.

यावेळी संपत्ती तोडासे, संदीप मसराम, नेहा वाघदरे, दिव्या कोराम, कृष्णा जाधव, प्रफुल सयाम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाईक यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना व उपक्रम राबवित आहे.

Nagpur Municipal corporation : महापालिकेची तक्रार करायची आहे? बिनधास्त करा!

याअनुषंगाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी समजून घणे. त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे. सुविधांमध्ये सुधारणा करणे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियान सुरुवात करण्यात आले आहे.