142 crore fund to Nagpur Zilla Parishad : पालकमंत्री बावनकुळेंच्या प्रयत्नांना यश
Nagpur राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांतून आता जिल्हा परिषदेला १४२ कोटी खर्च करता येणार आहे. राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार आणि नागपूर जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही ४२ कोटी रुपये अखर्चित होते. परंतु राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखर्चित निधी मंजूर करून घेतला आहे.
या संदर्भात अलीकडेच झालेल्या नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४२ कोटी रुपयांच्या अखर्चित निधीबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निधी लगेच सरकारकडून प्राप्त करून घेण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला.
त्यानुसार हा ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित असल्यामुळे हा १०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परंतु पालकमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना विनंती करून ही तांत्रिक अडचण देखील दूर केली आहे.
Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकेत निवडणूकीची नांदी !
त्यामुळे एकूण १४२ कोटी रुपयांचा निधी आता नागपूर जिल्हा परिषदेला प्राप्त होईल आणि या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील अनेक विकास कामे आता मार्गी लागतील. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. असे असताना नागपूर जिल्ह्याच्या विकासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला, ही गंभीर बाब देखील या निमित्ताने समोर आली आहे.