Breaking

NCP Ajit Pawar : युवकांनो, राजकारणात सक्रीय सहभाग घ्या !

Youth should take active part in politics : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘अजित पर्व’ अभियानाची सुरुवात ६ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे झाली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षल सुरज चव्हाण यांची उपस्थिती होती. त्यांनी तरुणांना राजकारणात सक्रीय होण्याचे आवाहन केले.

सुरज चव्हाण म्हणाले की, युवकांनी समाजसेवेत पुढे येऊन पक्ष संघटन मजबुतीसाठी योगदान द्यावे. युवकांचे राजकारणातील योगदान पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवकांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

NCP Ajit Pawar : ‘अजित पर्व’ अभियान देईल पक्षाला बळकटी !

दुपारी गर्दे हॉल येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पक्षाच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी युवक मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अॅड. नाझरे काझी, आमदार मनोज कायंदे, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे, प्रदेश सरचिटणीस इरफान अली यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे ध्येयधोरण युवकांपर्यंत पोहोचवून सदस्य नोंदणीस प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझरे काझी यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी स्पष्ट केले की, पक्ष संघटन मजबुतीकरणासाठी युवकांना संधी देणे आणि त्यांच्या सहभागातून पक्षाला बळकट करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अजितदादा पवार यांनी नेहमीच युवकांवर विश्वास दाखवला आहे आणि युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका पक्षाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल.

MLA Shweta Mahale : ॲग्रीस्टॅकबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा!

संघटन बांधणी आणि युवक जागर यावर भर देत, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी युवकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ‘अजित पर्व’ अभियानाच्या माध्यमातून पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करत सदस्य नोंदणी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.