Udyog Bhavan will be constructed in every district : उद्योगमंत्री उदय सामंत यांची नागपुरात घोषणा
Nagpur राज्य शासनाने उद्योगांना जास्त प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात जसे उद्योग भवन आहे. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योग भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उद्योग विभागाशी संबंधित सर्व विभाग एकाच इमारतीत येतील. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नागपुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होतो.
राज्यात प्रथमच नागपूरमध्ये कोराडी येथे महिला उद्योजिकांसाठी एमआयडीसी साकारली जाणार आहे. त्यासाठी जागेचे अधिग्रहण सुरू झाले आहे. एआय पॉलिसी AI Policy तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. लवकरच उद्योगही स्थापन होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Piyush Goyal : महाराष्ट्राकडून एक ट्रिलियन डॉलर्सचे योगदान हवे
एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेला गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे. लॉड्स कंपनीनंतर जिंदल गृपही येथे गुंतवणूक करीत आहे. त्या उद्योगांना अनुसरून गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात १० हजार एकर जागेवर इकोसिस्टम डेव्हलमेंट करण्यात येणार आहे. ४ हजार एकरच्या प्रस्तावाना नुकतीच मंजुरीही मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विदर्भात सातत्याने गुंतवणूक होत असल्याने हजारो लाखो युवकांना रोजगार मिळणार आहे. एमआयडीसी वस्त्रोद्योग धोरण राबवित असून टेक्सटाईल पार्क अमरावतीमध्ये साकारले जात आहे. तसेच नागपूरमध्ये जवापासून मद्य निर्मिती उद्योग प्रस्तावित आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
CM Devendra Fadnavis : AI क्षेत्रातील ‘स्टार्टअप्स’ला Full Support!
शिवाय नागपूरमध्ये प्रचलित असलेला अगरबत्ती क्लस्टरची माहितीही त्यांनी दिली. ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये काही करार होणार आहे. उद्योगांना सोयीचे ठरावे, यादृष्टीने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन उभारणार असून सर्व परवानग्या एका छताखाली मिळण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विभागाने एक पोर्टल सुरू केले असून कुठली फाईल कुठे अडली. याची माहिती मिळेल. उद्योगपतींना धमकावणे, खंडणी मागणे, त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.