Breaking

Gondia Zilla Parishad : विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व !

BJP dominates the subject committees in Gondia Zilla Parishad : चारही समित्यांवर भाजपचे सभापती

Gondia : गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४ विषय समितींकरीता आज १० जानेवारीला जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात निवडणूक झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी १३ तर भाजपच्या उमेदवारांना ३९ मते (भाजप २६, चाबी ४, अपक्ष २ व राष्ट्रवादी ८) मिळाली. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अर्जुनी गटाचे जिल्हा परिषद सदस्य चत्रुभूज बिसेन यांनी मतदानाचा हक्क न बजावता नाराजी दर्शवल्याचे वृत्त येत आहे.

सोमवार, दि. १० फेब्रुवारीला झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत मुंडीपार गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, पिंडकेपार जिल्हा परिषद गटाच्या दिपा चंद्रिकापूरे, इटखेडा गटाच्या अपक्ष जि.प.सदस्य पौर्णिमाताई ढेंगे महिला बालकल्याण सभापती पदावर तर समाजकल्याण सभापती पदावर तिरोडा तालुक्यातील सरांडी जि.प. गटाच्या रजनीताई कुंभरे या निवडून आल्या आहेत.

Uday Samant : ..तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं योग्य नाही !

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला बालकल्याण विषय समितीकरीता नेहा केतन तुरकर व इतर दोन विषय समितीकरीता किरण पारधी व जगदीश बावनथडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नमते घेत सादर केलेले ३ विषय समितीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून समाजकल्याण विषय समितीकरीता उषा शहारे, महिला बालकल्याण समितीकरीता विमल कटरे व इतर दोन विषय समितीकरीता जितेंंद्र कटरे व छाया नागपूरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

भंडारा जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिलेल्या झटक्याचा बदला गोंदिया जि.प.च्या विषय समिती निवडणुकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे भाजप सदस्य उपाध्यक्षाच्या निवडणुकीतच राष्ट्रवादीच्या बाजूने नव्हते. परंतु वरिष्ठांच्या आदेशावर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक एकत्र लढले. आज झालेल्या विषय समिती निवडणुकीत भाजपने बहुमताच्या बळावर राष्ट्रवादीला मात्र दूर ठेवले. विषय समिती वाटप करताना उपाध्यक्षाकडे आरोग्य व शिक्षण हे पद कायम राहते की कृषी व पशुसंवर्धन हे दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Farmer Suicide : गोंदियात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या!

आमगाव-देवरी मतदारसंघातून भाजपचे हनवंत वट्टी, किशोर महारवाडे हे सदस्य असताना या दोन्ही सदस्यांना मात्र पूर्ण कालावधीत या मतदारसंघाच्या आमदार दाम्पत्यामुळे संधी मिळू शकली नाही. पहिल्या टर्ममध्ये हनवंत वट्टी यांना संधी असतानाही त्यांना डावलण्यात आले होते. तीच परिस्थिती दुसऱ्या टर्ममध्येसुध्दा झाली.